सोनं 1 लाखाच्या खाली, चांदी मात्र विक्रमी पातळीवर, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे दर
सोन्याचे चांदी किंमत : गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. जागतिक बाजारात डॉलर मजबूत झाला आहे, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ आणि ट्रेड वॉर धोरणांमुळे सोने आणि चांदी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित बनत आहेत. अशा परिस्थितीत, भारतीय बाजारपेठेतही या दोन्ही धातूंच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. जाणून घेऊयात कोणत्या शहरात सोन्या चांदीचे दर काय आहेत? याबाबतची माहिती.
सोन्याने 20 वर्षांत 1200 टक्के परतावा दिला
गेल्या दोन दशकात गुंतवणूकदारांसाठी सोने ही सर्वात विश्वासार्ह मालमत्ता म्हणून उदयास आली आहे. 2005 मध्ये सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 7638 रुपये होती, तर जून 2025 पर्यंत हा आकडा 100000 रुपयांच्या पुढे गेला आहे. म्हणजेच सुमारे 1200 टक्क्यांचा जबरदस्त परतावा मिळाला आहे. 2025 या वर्षात सोने आतापर्यंत 31 टक्क्यांची वाढीसह बाजारात सर्वात वेगाने वाढणाऱ्या मालमत्तेपैकी एक बनले आहे.
चांदीनेही गुंतवणूकदारांना दिला मोठा नफा
2005 पासून चांदीच्या किंमतीत सुमारे 668 टक्के वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीची किंमत प्रति किलो 1 लाखाच्या वर राहिली आहे, जी गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचा संकेत आहे. हा धातू दीर्घकालीन गुंतवणुकीच्या बाबतीत देखील फायदेशीर सौदा आहे.
सोने 1 लाखाच्या खाली
आज 3 ऑगस्ट 2025 रोजी, सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) नुसार, आज सकाळी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 99049 वर पोहोचली, तर एक किलो चांदी 110224 वर व्यवहार करत होती. त्याच वेळी, इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 99810 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 99413 वर नोंदवण्यात आली. चांदीची किंमतही प्रति किलो 110560 पर्यंत वाढली आहे. तेजीच्या या काळात, गुंतवणूकदार आणि खरेदीदार दोघेही आता पुढील काही दिवसांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.
तुमच्या शहरात सोने आणि चांदीचा दर काय आहे?
सोने आणि चांदी
मुंबई 99,630 1,10,360
दिल्ली 99,460 1,10,170
कोलकाता 99,500 1,10,210
बंगळुरु 99,710 1,10,440
हैदराबाद 99,790 1,10,530
चेन्नई 99,920 1,10,680
बाजारातील तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जर जागतिक अस्थिरता आणि भू-राजकीय तणाव कायम राहिला तर येत्या काही महिन्यांत सोने आणि चांदीच्या किमती आणखी वाढू शकतात. सोने आणि चांदीच्या किमती जास्त असूनही, गुंतवणूकदारांना यामध्ये नफा कमावण्याची संधी आहे.
आणखी वाचा
Comments are closed.