सोनं-चांदीचे दर स्थिरावले, आज किती आहे 24 आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव? जाणून घ्या लेटेस्ट रेट
सोन्याचांदीचा आजचा भाव: आज रविवार, 26 एप्रिल 2026 रोजी देशांतर्गत बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज किमतींमध्ये कोणतीही मोठी वाढ किंवा घट झालेली नाही. गुंतवणुकीसाठी किंवा दागिन्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत जाण्यापूर्वी आजचे दर तपासून घेणे आवश्यक आहे.
Gold Price Today: सोन्याचे आजचे दर (24, 22 आणि 18 कॅरेट)
24 कॅरेट (शुद्ध सोने): आज 1 ग्रॅमची किंमत 15,404 रुपये आहे. 10 ग्रॅमसाठी ग्राहकांना 1,54,040 रुपये मोजावे लागतील.
22 कॅरेट (दागिन्यांचे सोने): दागिन्यांसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याचा दर 14,120 रुपये प्रति ग्रॅम आहे. 10 ग्रॅमची किंमत 1,41,200 रुपये इतकी आहे.
18 कॅरेट सोने: 18 कॅरेट सोन्याचा दर 11,553 रुपये प्रति ग्रॅम असून 10 ग्रॅमसाठी 1,15,530 रुपये मोजावे लागतील.
Gold Price Today: प्रमुख शहरांमधील 10 ग्रॅम सोन्याचा भाव
| शहर | 24 कॅरेट सोन्याची किंमत | 22 कॅरेट सोन्याची किंमत |
| मुंबई | रु 1,54,050 | 1,41,210 रु |
| दिल्ली | 1,54,200 रु | 1,41,360 रु |
| कोलकाता | रु 1,54,050 | 1,41,210 रु |
| चेन्नई | रु. 1,53,810 | १,४०,९९० रु |
| बेंगळुरू | १,५४,०४० रु | 1,41,120 रु |
Silver Price Today चांदीची आजची किंमत
भारतात आज चांदीच्या किमतीतही स्थिरता पाहायला मिळत आहे. 1 ग्रॅम चांदीचा दर 260 रुपये असून, 1 किलोग्राम चांदीसाठी 2,60,000 रुपये मोजावे लागतील. गेल्या काही दिवसांपासून चांदीने उच्चांकी पातळी गाठलेली आहे.
Gold Silver Price: पुढील आठवड्याचा अंदाज
येत्या 27 एप्रिल ते 2 मे दरम्यान सोन्याच्या किमतीत संमिश्र कल पाहायला मिळू शकतो. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिका-इराणमधील तणाव यामुळे सोन्याला आधार मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरांबाबत काय भूमिका घेते, यावर सोन्याची पुढील दिशा अवलंबून असेल.
सोन्या-चांदीचा आजचा भाव:22 आणि 24 कॅरेट सोनं म्हणजे नेमकं काय?
वजन मोजण्यासाठी किलो हे एकक आहे. पाणी मोजण्यासाठी लीटर या एककाचा वापर केला जातो. त्याच पद्धतीने सोन्याची शुद्धता मोजायची असेल तर कॅरेट या एककाचा वापर केला जातो. जेव्हे कॅरेट जास्त तेवढेच सोने शुद्ध असे मानले जाते. 24 कॅरेट सोने हे सर्वांत शुद्ध असल्याचे बोलले जाते. 24 कॅरेट सोनेच्या शुद्धता ही 99.9 टक्के असते. त्यामुळे या सोन्याचा भावही इतर सोन्याच्या तुलनेत अधिक असतो. 24, 22, 18, 14 अशा वेगवेगळ्या प्रकारचे सोने असते. 24 कॅरेट सोने वगळता इतर सर्व प्रकारच्या सोन्यात तांबे, चांदी असे इतर धातू मिसळले जातात. सोन्याच्या आभूषणांना मजबुती यावी म्हणून हे धातू सोन्यात मिसळले जातात. सोन्याची गुववत्ता ही बीआयएस या संस्थेतर्फे ठरली जाते. त्यामुळे हॉलमार्क असलेले सोनेच खरेदी करायला हवे, असा सल्ला दिला जातो.
आणखी वाचा
मुलींसाठी सरकारनं सुरु केलेल्या योजना कोणत्या? लाभ मिळवण्यासाठी काय कराल?
आणखी वाचा
Comments are closed.