इराण-अमेरिकेतील तणाव कमी होताच सोन्याच्या दरात मोठी उसळी, चांदीचा भावही वाढला, 10 ग्रॅम सोन्याच
मुंबई : अमेरिका इराणमध्ये युद्धजन्य परिस्थिती निवळण्याचे संकेत मिळताच सोने आणि चांदीच्या दरात मोठी (Gold-Silver Rate) वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे, गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात ३२०० रुपयांची वाढ होऊन सोने जीएसटी शिवाय १४७८०० वरून १५१००० वर जाऊन पोहोचले आहे. तर चांदीच्या (Gold-Silver Rate)दरात ही १०००० रुपयांची वाढ होऊन २४५००० हजार वरून दर २५५००० वर पोहोचले आहेत. देशातील सोन्याच्या दरात आज पुन्हा किरकोळ वाढ नोंदवण्यात आली आहे. ७ मे रोजी २४ कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली असून, २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्याही किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला अधिक झळ बसणार आहे.(Gold-Silver Rate)
गुड रिटर्न्सच्या अहवालानुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतिग्रॅम १५,२४६ रुपयांवर पोहोचला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १३,९७५ रुपये प्रतिग्रॅम झाला असून, १८ कॅरेट सोन्याचा दर ११,४३४ रुपये प्रतिग्रॅम इतका नोंदवण्यात आला आहे. २२ कॅरेट सोन्याचे दागिने बनवण्यासाठी आज १० ग्रॅमसाठी ग्राहकांना सुमारे १,३९,७५० रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये मेकिंग चार्जेस आणि जीएसटीचा अतिरिक्त खर्च वेगळा असणार आहे.(Gold-Silver Rate)
Gold-Silver Rate: आजचे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत
दिल्ली
२४ कॅरेट : १५,२३९ रुपये ग्रॅम
२२ कॅरेट : १३,९९० रुपये ग्रॅम
मुंबई
२४ कॅरेट : १५,२४६ रुपये ग्रॅम
२२ कॅरेट : १३,९७५ रुपये ग्रॅम
कोलकाता
२४ कॅरेट : १५,२४६ रुपये ग्रॅम
२२ कॅरेट : १३,९७५ रुपये ग्रॅम
बेंगळुरू
२४ कॅरेट : १५,२४६ रुपये ग्रॅम
२२ कॅरेट : १३,९७५ रुपये ग्रॅम
चेन्नई
२४ कॅरेट : १५,३८३ रुपये ग्रॅम
२२ कॅरेट : १४,१०१ रुपये ग्रॅम
लखनौ
२४ कॅरेट : १५,२३९ रुपये ग्रॅम
२२ कॅरेट : १३,९९० रुपये ग्रॅम
पाटणा
२४ कॅरेट : १५,२५१ रुपये ग्रॅम
२२ कॅरेट : १३,९८० रुपये ग्रॅम
जयपूर
२४ कॅरेट : १५,२३९ रुपये ग्रॅम
२२ कॅरेट : १३,९९० रुपये ग्रॅम
सुरत
२४ कॅरेट : १५,२५१ रुपये ग्रॅम
२२ कॅरेट : १३,९८० रुपये ग्रॅम
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, डॉलरचा दर आणि मागणी-पुरवठा यांचा परिणाम सोन्याच्या किमतींवर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Gold : कायद्यानुसार घरात किती सोनं ठेवता येईल?
भारतात सोन्याच्या दागिन्यांचं सांस्कृतिक महत्त्व आहे. घरी किती सोन्याचा साठा करायचा यासंदर्भात आयकर विभागाचे काही नियम आहेत. ते अनेकांना माहिती नसतात. पुरुष घरी 100 ग्रॅम, अविवाहित महिला 250 ग्रॅम तर विवाहित महिला 500 ग्रॅम सोनं ठेवू शकतात. मर्यादेपेक्षा अधिक सोन्याचा साठा केल्यास आयकर विभाग नोटीस देऊ शकतो किंवा छापेमारी करू शकतो. घोषित उत्पन्नातून खरेदी केलेलं किंवा वारसाने मिळालेलं सोनं करमुक्त असतं. वैध कागदपत्रांसह सोनं ठेवल्यास त्यावर कारवाई होत नाही.
आणखी वाचा
Comments are closed.