‘वर्षभर सोने खरेदी करू नका…’ PM मोदींच्या आवाहनानंतर आज सोन्याचे दर घसरले की वाढले? पाहा तुमच
सोन्याचांदीचा आजचा भाव: देशात गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नागरिकांना “एक वर्ष सोने खरेदी टाळा” असे आवाहन केल्यानंतर आज सोन्याच्या दरात किरकोळ घसरण नोंदवण्यात आली आहे.
रविवारी हैदराबाद येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी देशाची परकीय चलन बचत करण्यासाठी नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पेट्रोल-डिझेलचा संयमित वापर, अनावश्यक परदेश प्रवास टाळणे, खाद्यतेलाचा कमी वापर आणि एक वर्ष सोने खरेदी न करण्याचा सल्ला त्यांनी दिला. अमेरिका-इराण तणाव, मध्यपूर्वेतील अस्थिर परिस्थिती आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकार आर्थिक परिणामांशी सामना करत असल्याचे मानले जात आहे.
Gold Price Today: जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दरात घसरण
आज 11 मे 2026 रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात सौम्य घसरण दिसून आली. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,52,500 रुपये असून 250 रुपयांची घसरण झाली आहे. मुंबई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,52,350 रुपये आहे. चेन्नईमध्ये सोन्याच्या दरात सर्वाधिक 300 रुपयांची घसरण झाली असून दर 1,54,370 रुपये आहे. जळगाव सराफ बाजारातही सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली. आज सोन्याचा दर 1,50,500 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका असून परवाच्या तुलनेत 300 रुपयांनी कमी झाला आहे.
Gold Price Today: प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे दर
| शहर | 24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) | 22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) | कालच्या तुलनेत बदल |
|---|---|---|---|
| दिल्ली | १,५२,५०० | १,३९,८०० | 250 रुपयांची घसरण |
| मुंबई | १,५२,३५० | १,३९,६५० | 200 रुपयांची घसरण |
| कोलकाता | १,५२,३५० | १,३९,६५० | 200 रुपयांची घसरण |
| चेन्नई | १,५४,३७० | १,४१,५०० | 300 रुपयांची घसरण |
| बेंगळुरू | १,५२,३५० | १,३९,६५० | 200 रुपयांची घसरण |
| हैदराबाद | १,५२,३५० | १,३९,६५० | 200 रुपयांची घसरण |
| अहमदाबाद | १,५२,४०० | १,३९,७०० | 250 रुपयांची घसरण |
| लखनौ | १,५२,५०० | १,३९,८०० | 250 रुपयांची घसरण |
| जयपूर | १,५२,५०० | १,३९,८०० | 250 रुपयांची घसरण |
Silver Price Today: चांदीचे दर किती?
चांदीच्या दरात मात्र फारसा बदल झालेला नाही. जळगावात चांदीचा दर आज 2,60,000 रुपये प्रति किलो इतकाच कायम आहे. हे दर जीएसटी वगळून आहेत. देशभरात चांदीची सरासरी किंमत सुमारे 2,74,900 रुपये प्रति किलो इतकी असून कालच्या तुलनेत प्रति किलो 100 रुपयांची किरकोळ घसरण झाली आहे. दिल्ली, मुंबईकोलकाता आणि बेंगळुरूमध्ये चांदीचा दर 2,74,900 रुपये आहे, तर चेन्नई आणि हैदराबादमध्ये तो 2,80,000 रुपयांवर स्थिर आहे.
Gold Silver Price: दर का कमी होत आहेत?
– भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोने ग्राहक देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खरेदी मानसिकतेवर झाल्याचे दिसून येत आहे. मागणी कमी झाल्यास बाजारात किमती आपोआप घसरतात, त्यामुळे सोन्याच्या दरावर दबाव निर्माण झाला आहे.
– बाजारात अशीही चर्चा आहे की, जर नागरिकांनी स्वतःहून सोन्याची खरेदी कमी केली नाही, तर सरकार आयात शुल्क वाढवू शकते. या भीतीमुळे काही व्यापारी आणि गुंतवणूकदार सोन्यातील आपली गुंतवणूक कमी करत आहेत. त्यामुळेही किमतींवर दबाव वाढला आहे.
– अलीकडेच सोने प्रति 10 ग्रॅम दीड लाख रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले होते. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी यांनी एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे केलेले आवाहन गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा संकेत मानला जात आहे. त्यामुळे पुढील काळात सोन्याच्या किमती स्थिर राहू शकतात किंवा घसरू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, अनेक गुंतवणूकदार नफा कमावण्यासाठी सोने विक्रीस काढत आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.