आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या (gold silver price) किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत चढ-उतार निर्माण झाला असून, याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवरही होत आहे. मात्र, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या आठवड्यात सोने आणि चांदीच्या (gold silver price) किमतीत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.(gold silver price)

एका आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किमती लक्षणीय कमी झाल्या आहेत. ६ मार्च २०२६ रोजी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,६१,६७५ रुपयांच्या आसपास होता. संपूर्ण आठवड्याचा विचार करता सोन्याच्या किमतीत तब्बल ३,२७५ रुपयांची घट झाली आहे.(gold silver price)

६ मार्च रोजी चांदीचा भाव २,६८,५७९ रुपये प्रति किलो होता. या आठवड्यात चांदीच्या दरात सुमारे ९,३३० रुपयांची मोठी घसरण नोंदवली गेली आहे.चांदीचा आजचा दरदेशातील प्रमुख शहरांमध्ये चांदीच्या दरात आज खालीलप्रमाणे बदल दिसून येत आहेत:दिल्ली, मुंबई आणि कोलकाता: येथे १० ग्रॅम चांदीचा दर २,७५० रुपये आहे, तर १०० ग्रॅम चांदीसाठी २७,५०० रुपये मोजावे लागतील.चेन्नई: चेन्नईमध्ये चांदीचे दर थोडे जास्त असून १० ग्रॅम चांदी २,८०० रुपयांना मिळत आहे.(gold silver price)

सुरक्षित गुंतवणुकीचा उत्तम पर्यायजागतिक स्तरावर जेव्हा राजकीय किंवा आर्थिक अस्थिरता निर्माण होते, तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्या-चांदीकडे वळतात. इराण-इस्रायल युध्दासारख्या अनिश्चित काळातही सोन्यातील गुंतवणूक आजही तितकीच विश्वासार्ह मानली जाते. त्यामुळे बाजारपेठेतील चढ-उतारांचा फायदा घेऊन अनेक जण गुंतवणुकीची संधी शोधत आहेत.(gold silver price)

तुमच्या शहरांमधील सोन्याचे दर

१. दिल्ली (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट: ₹१,५९,८१०

२२ कॅरेट: ₹१,४६,५००

१८ कॅरेट: ₹१,१९,८९०

२. मुंबई (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट: ₹१,५९,६६०

२२ कॅरेट: ₹१,४६,३५०

१८ कॅरेट: ₹१,१९,७४०

३. चेन्नई (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट: ₹१,६१,०२०

२२ कॅरेट: ₹१,४७,६००

१८ कॅरेट: ₹१,२४,०००

४. कोलकाता (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट: ₹१,५९,६६०

२२ कॅरेट: ₹१,४६,३५०

१८ कॅरेट: ₹१,१९,७४०

५. अहमदाबाद (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट: ₹१,५९,७१०

२२ कॅरेट: ₹१,४६,४००

१८ कॅरेट: ₹१,१९,७९०

६. लखनऊ (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट: ₹१,५९,८१०

२२ कॅरेट: ₹१,४६,५००

१८ कॅरेट: ₹१,१९,८९०

७. पटना (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट: ₹१,५९,७१०

२२ कॅरेट: ₹१,४६,४००

१८ कॅरेट: ₹१,१९,७९०

8. हैदराबाद (प्रति 10 ग्रॅम)

२४ कॅरेट: ₹१,५९,६६०

२२ कॅरेट: ₹१,४६,३५०

१८ कॅरेट: ₹१,१९,७४०

Comments are closed.