सोने- चांदीच्या दरवाढीला ब्रेक, चांदीच्या दरात 2 दिवसात 2 हजार रुपयांची घसरण, जाणून घ्या नवे दर
आजचा सोन्याचा दर आणि चांदीचा दर: अमेरिका, इस्त्रायल आणि इराण (Iran vs Israel America war) यांच्यात सुरुअसलेला संघर्ष हा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. पश्चिम आशियातील युद्धाचे ढग गडद झाल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम उमटू लागले आहेत. याचे तीव्र पडसाद आज भारतीय शेअर बाजारात (Stock Market Crash Today) पाहायला मिळाले असताना दुसरीकडे सोन्या चांदीच्या दरातही मोठी घसरण होताना दिसत आहे. (America vs Israel War)
दोन दिवसाच्या तुलनेत सोन्याच्या दरात घसरण, नेमकं कारण काय? (आजचे सोने आणि चांदीचे दर)
अमेरिका इजरायल आणि इराण यांच्या मधील युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मात्र दिवसागणिक घसरण होत असल्याच पाहायला मिळत आहे. अमेरिका इजरायल ने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याच्या नंतर एकाच आठवड्यात त्यात पुन्हा एकदा घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवार रविवार बाजारपेठ बंद असताना, आज बाजारपेठेत नव्याने काय दर उघडतात, याकडे लक्ष लागले असताना गेल्या दोन दिवसाच्या तुलनेत सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचं दर जीएसटी शिवाय 1,61,000 वरून 1, 59,500 वर खाली आले आहेत.
दोन दिवसात चांदीच्या दरात ही घसरण (Silver Rate Today)
तर दुसरीकडेचांदीच्या दरात ही दोन दिवसात दोन हजार रुपयांची घसरण होऊन चांदीचे दर जीएसटी शिवाय 2,68,000 हजार वरून 2,66,000 वर खाली आले आहेत्यामुळे. युद्धजन्य परिस्थिती असल्याने गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा क्रूड तेलामध्ये गुंतवण्यास सुरुवात केल्याने काही प्रमाणात सोने चांदीच्या दरात घसरण होत असल्याच सोने व्यावसायिक सांगत आहे.
तुमच्या शहरातील सोन्याचा भाव (गुड रिटर्न नुसार)
दिल्लीतील सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,६३,७९० रुपये
२२ कॅरेट – १,५०,१४० रुपये
१८ कॅरेट – १,२२,८७० रुपये
मुंबईतील सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,६३,६३० रुपये
२२ कॅरेट – १,४९,९९० रुपये
१८ कॅरेट – १,२२,७२० रुपये
चेन्नईमध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,६३,०९० रुपये
२२ कॅरेट – १,४९,५०० रुपये
१८ कॅरेट – १,३०,००० रुपये
कोलकातामध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,६३,६३० रुपये
२२ कॅरेट – ₹१,४९,९९०
१८ कॅरेट – ₹१,२२,७२०
हैदराबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,६१,६८०
२२ कॅरेट – ₹१,४८,२००
१८ कॅरेट – ₹१,२१,२६०
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.