सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ! खरेदी करण्यापूर्वी पाहा तुमच्या शहरातील ताजे भाव
मुंबई : देशभरात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार (Gold Silver Price Today) होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या आठवडाभरात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ नोंदवली गेली असून, त्यामुळे ग्राहकांनी खरेदीपूर्वी ताजे दर तपासणे महत्त्वाचे झाले आहे. विशेषतः २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याच्या दरांमध्ये (Gold Silver Price Today) मोठी वाढ झाली आहे.गेल्या एका आठवड्यात २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत सुमारे १,६४० रुपयांची वाढ झाली आहे. तर २२ कॅरेट सोनेही जवळपास १,५०० रुपयांनी महागले आहे.(Gold Silver Price Today)
Gold Silver Price Today: १० मे रोजीचे सोन्याचे दर
राजधानी दिल्लीमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५२,५०० रुपयांवर पोहोचला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३९,८०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे.दरम्यान, दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी (८ मे) सोन्याच्या किंमतीत १०० रुपयांची घसरण होऊन दर १,५५,९०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारात हाजिर सोन्याचा दर सध्या ४,७२१ डॉलर प्रति औंस या स्तरावर व्यवहार करत आहे.(Gold Silver Price Today)
Gold Silver Price Today: प्रमुख शहरांतील सोन्याचे दर
मुंबई
1,39,650 रु
1,52,350 रु
अहमदाबाद
1,39,700 रु
1,52,400 रु
चेन्नई
1,41,500 रु
रु 1,54,370
कोलकाता
1,39,650 रु
1,52,350 रु
हैदराबाद
1,39,650 रु
1,52,350 रु
जयपूर
1,39,800 रु
1,52,500 रु
भोपाळ
1,39,700 रु
1,52,400 रु
लखनौ
1,39,800 रु
1,52,500 रु
चंदीगड
1,39,800 रु
1,52,500 रु
Gold Silver Price Today: चांदीच्या दरातही मोठी वाढ
सोनेप्रमाणेच चांदीच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात चांदी जवळपास १० हजार रुपयांनी महागली आहे. १० मे रोजी सकाळी चांदीचा दर प्रति किलो २,७५,००० रुपयांवर पोहोचला आहे. याआधी ८ मे रोजी दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा दर २०० रुपयांनी घसरून २,६१,३०० रुपये प्रति किलो झाला होता. मात्र त्यानंतर पुन्हा तेजी दिसून आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर ८१.१४ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.
Gold Silver Price Today: मागच्या ५ महिन्यात सोने तब्बल ३० ते ४० हजारांनी स्वस्त
अमेरिका इराण युद्धाचा परिणाम सोने चांदी दरावर होत असताना पहायला मिळत आहे. मागच्या ५ महिन्यात सोने तब्बल ३० ते ४० हजारांनी स्वस्त होऊ दिड लाखांच्या घरात दर येऊन थांबला आहे. तर चांदी तब्बल २ लाखांनी उतरून अडिच लाखांवर येऊन थांबली आहे. दरम्यान, अमेरिका इराण युद्धविरामानंतर कच्चा तेलाचे दर वाढत असले तरी सोने चांदीच्या दरात मात्र घसरण होत असताना पहायला मिळत आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला त्यावेळी १ लाख ५२ हजारांवर सोने थांबले तर चांदी २ लाख ६१ हजारांवर येऊन थांबली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.