दिलासादायक बातमी! सलग तिसऱ्या दिवशी दरात घसरण, चांदीचे दरही कमी, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर?

सोन्याचे चांदीचे दर: सोन्या चांदीची (Gold Silver ) खरेदीकरणाऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेने जपान आणि फिलीपिन्ससोबत केलेल्या अलिकडच्या व्यापार करारामुळं गेल्या 3 दिवसांपासून सोन्याच्या किंमती सतत घसरत आहेत. एक दिवस किंमती स्थिर राहिल्यानंतर आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

आज 24 कॅरेट सोने 1 लाख 470 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उपलब्ध आहे. जे एका दिवसापूर्वी 1 लाख 960  रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात होते. शुक्रवारी सोन्याच्या किमतीत 1380 रुपयांची घसरण झाली होती, तर चांदीही 1200 रुपयांनी स्वस्त झाली होती. आज 22 कॅरेट सोने 92 हजार 90 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे तर 18 कॅरेट सोने 75 हजार 350 रुपये दराने विकले जात आहे. तु

तुमच्या शहरात सोन्याचे दर काय?

आज, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोने 1 लाख 620 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. तर 22 कॅरेट सोने 92 हजार 240 रुपये आणि 18 कॅरेट सोने 75 हजार 470 रुपये दराने विकले जात आहे. आर्थिक राजधानी मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि आयटी सिटी बेंगळुरूमध्ये 24 कॅरेट सोने 1 लाख 470 रुपये दराने विकले जात आहे, तर 22 कॅरेट सोने या शहरांमध्ये 92 हजार 90 रुपये दराने विकले जात आहे. 18 कॅरेट सोने मुंबईत 75 हजार 350 रुपये, चेन्नईमध्ये 75 हजार 890 रुपये आणि कोलकाता-बेंगळुरूमध्ये 75 हजार 350 रुपये दराने व्यवहार करत आहे.

दर कसा ठरवला जातो?

अलिकडच्या दिवसांत सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये बरेच चढ-उतार दिसून आले आहेत. त्याच्या किमती दररोज निश्चित केल्या जातात. यासाठी अनेक घटक जबाबदार आहेत, ज्यात विनिमय दर, डॉलरच्या किमतीतील चढ-उतार, सीमाशुल्क यांचा समावेश आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अशांततेचाही सोन्याच्या किमतींवर परिणाम होतो. जर जागतिक बाजारात अनिश्चिततेची परिस्थिती असेल, तर गुंतवणूकदार बाजारापासून दूर राहून सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीत पैसे गुंतवणे चांगले मानतात.

भारतात सोन्याचे सामाजिक-आर्थिक महत्त्व देखील आहे. येथे कोणत्याही लग्नात किंवा उत्सवात सोने असणे खूप शुभ मानले जाते. याशिवाय, कुटुंबात सोने असणे हे त्या कुटुंबाच्या समृद्धीचे प्रतीक मानले जाते. सोने हा एक मालमत्ता वर्ग आहे जो प्रत्येक युगात महागाईपेक्षा चांगला परतावा देतो. म्हणूनच त्याची मागणी नेहमीच राहिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Gold Price Today: ग्राहकांना मोठा दिलासा, सोनं झालं स्वस्त, किमतीत 1000 रुपयांची घसरण; तुमच्या शहरातील दर काय? जाणून घ्या सविस्तर

आणखी वाचा

Comments are closed.