सोने-चांदीच्या भावात मोठा उलटफेर, लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांना दिलासा, सोने-चांदीचा आजचा भाव

सोन्याचांदीचे आजचे दर: भारतात ऐन लग्नसराईच्या काळात सोन्या चांदीच्या दरात होणारी चढ उतार ग्राहकांना अधिक संभ्रमात टाकताना दिसत आहे . जागतिक  अनिश्चिततेसह अनेक कारणांमुळे सोन्या-चांदीच्या किमती सध्या कमी जास्त होत आहेत.  मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. आज जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्या चांदीच्या दारात मोठा उलटफेर दिसून आलाय. कालच्या तुलनेत सोन्याचे भाव पाचशे रुपयांनी घसरलेत. तर, चांदीच्या दरात कालच्या तुलनेत 1000 रुपयांनी वाढ झाली आहे. जळगावच्या सराफा बाजारात जीएसटीशिवाय 24 कॅरेट सोन्याचा दर 1,49,000 रुपये झालाय. तर किलोमागे चांदीसाठी ग्राहकांना दोन लाख 43 हजार रुपये द्यावे लागत आहेत.  (Jalgaon Gold Silver Rates)

देशांतर्गत पातळीवर सोन्याचा दर किती ?

बुलियन असोसिएशनच्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 1.3 % नी घसरला आहे. आज सोन एक लाख 49 हजार 890 रुपयांवर स्थिरावलं आहे. काल  हाच दर 1 लाख 49 हजार  754 रुपये होता. तर चांदीचे दर दोन लाख 38 हजार 930 रुपये प्रति किलो झाले आहेत. आज 22 कॅरेट सोन्याचा दर तोळ्यामागे 1 लाख 60 हजार 260 रुपये झालाय.

सोन्या – चांदीचे दर घसरण्याचं कारण काय ?

शेअर बाजारात ज्यांना नुकसान होतं ते गुंतवणूकदार शेअरची विक्री करून भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने आणि चांदीतील गुंतवणुकीला त्यांचे प्राधान्य असतं. दरम्यान मध्यपूर्व आशियातील संघर्ष आणि ताणामुळे सोन्या चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ उतार दिसून येत आहे. अमेरिका इराण यांच्यातील संघर्ष मिटण्याची चिन्ह निर्माण झाल्याने बाजारात पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळतेय. परिणामी गुंतवणूकदारांचा कल पुन्हा एकदा भांडवली बाजाराकडे दिसून येतोय. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने सोन्याचे दर कमजोर झाल्याचं तज्ञ सांगतात. जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा इतर देशांना दुसऱ्या चलनातून सोने खरेदी करणे महाग पडतो त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी कमी होते. हे सोन्या-चांदीचे भाव घसरण्या मागचं प्रमुख कारण आहे.

आणखी वाचा

Comments are closed.