धक्कादायक! 2 पोत्यांमध्ये आढळले शरीराचे तुकडे; फायनान्स कंपनीतील वसुलीदाराचा मृतदेह कुजलेल्या अ

गोंडिया गुन्हा: गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील दशरथटोला (बाह्मणी) परिसरात पोत्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची ओळख पटल्याची माहिती सालेकसा पोलिसांनी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली असून शुभम वाहने (26) रा. दैतबर्रा जिल्हा बालाघाट मध्यप्रदेश असे मृतकाचे नाव आहे. (Crime News) सालेकसा तालुक्यातील दशरथटोला येथे 2 वेगवेगळ्या पोत्यांमध्ये शरीरापासून डोकं वेगळा असलेला एक मानवी अवशेष आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नेमकं घडलं काय?

शुभम वाहने हा स्पंदना मायक्रो फायनान्स कंपनीमध्ये लोन किस्त वसुलीचे काम करत होता. 4 सप्टेंबर रोजी तो सालेकसा येथे वसुलीसाठी आला होता. मात्र त्यानंतर तो बेपत्ता झाला. या संदर्भात कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. परंतु 21 सप्टेंबर रोजी दशरथटोला परिसरातील शेतात दोन पोत्यांमध्ये कुजलेल्या अवस्थेत मानवी अवयव आढळले. एका पोत्यात धड तर दुसऱ्यात डोक्यासह इतर अवयव आढळले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने सुरुवातीला ओळख पटवणे अवघड होते. परंतु पोलिसांनी तपास करून हा मृतदेह शुभम वाहने याचाच असल्याचे निश्चित केले. पोलिसांनी मृतकाच्या कुटुंबीयांना संपर्क साधून माहिती दिली. घटनेची गंभीरता लक्षात घेता सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन पोत्यांमध्ये वेगळे केलेले शरीराचे भाग

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक भूषण बुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून, मृतकाच्या मृत्यूमागील कारणे, त्याचा संबंध कामाशी आहे का, याचा तपास सुरू आहे. शुभम हा लोन वसुलीचे काम करत असल्याने त्याचा कुणाशी वाद झाला होता का, हेही तपासले जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन पोत्यांमध्ये वेगळे केलेले शरीराचे भाग आढळल्याने हा पूर्वनियोजित खून असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

शुभम वाहने हा तरुण मध्यप्रदेशातील असून, कामानिमित्त गोंदियात वारंवार येत असे. 4 सप्टेंबरपासून तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असताना त्याचा असा भयानक मृत्यू झाल्याने कुटुंबीय शोकाकुल झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गतीमान केला असून लवकरच आरोपींचा शोध लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा

Ahilyanagar Crime : आपल्यात जे झाले ते विसरून जा, तुला जे करायचे ते कर; लग्नाचे आमिष दाखवून पोलिसाकडून महिलेवर अत्याचार, अहिल्यानगर हादरलं!

आणखी वाचा

Comments are closed.