धक्कादायक!  जादूटोणाच्या संशयातून गोंदियात वृद्धाची हत्या, काही तासातच आरोपीला अटक

गोंडिया क्राइम न्यूज: गोंदिया (गोंडिया ) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका 60 वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने वार करुन सारकॅसम केल्याची घटना गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा/हेटी येथे उघडकीस आली आहे. आसाराम देऊ कांबळे (60) रा. हेटी (पालेवाडा) ता. गोरेगाव असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pilice) एका आरोपीला केली अटक केली आहे. जादूटोणाच्या संशयातून हत्या केल्याची कबूली आरोपीनं दिली आहे.

याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून  स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने काही तासातच आरोपी दिनेश उर्फ भुरू चुन्नीलाल ताराम (24) रा. हेटी/पालेवाडा यास ताब्यात घेतले. दरम्यान, जादुटोण्याच्या संशयावरून खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. मृत आसाराम कांबळे हा गावाजवळील जंगल शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेला असता सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत घरी परतले नाहीत. तर शेळ्या मात्र घरी आल्याने आसारामच्या कुटुंबीयांनी गावकऱ्यांसह जंगलाकडे धाव घेतली. यावेळी त्यांना आसाराम यांचा मृतदेह आढळून आला. ही घटना जंगल शिवारातील असल्याने व आसारामच्या मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसून आल्याने प्रथमदर्शनी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात त्याच्या मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करत गावकऱ्यांनी घटनेची माहिती गोरेगाव वन विभागाला दिली.

जादुटोणाच्या संशयावरून केली हत्या

दरम्यान, वन विभागाच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता हा प्रकार घातपाताच्या असल्याचे दिसून आले. यावर त्यांनी गोरेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळ घाटून पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवले या प्रकरणी गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या पथकाकडून गावात तपास केला असता मृत आसाराम कांबळे याची हत्या भुरु ताराम याने केल्याची गोपनीय माहिती मिळाली. या आधारे आरोपी भुरु ताराम याचा शोध घेण्यासाठी हेटी (पालेवाडा), मुंडीपार, भंड़गा, हलबीटोला (गोरेगाव) येथे शोध पथके रवाना करण्यात आली असता, रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास आरोपी भुरु ताराम हा हलबीटोला (गोरेगाव) येथील आपल्या मावशीच्या घरी मिळून आला. यावेळी त्यास गुन्ह्याबाबत विचारणा केली असता, सुरुवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिल्यानंतर जादुटोणाच्या संशयावरून आसाराम कांबळे यास डोक्याच्या मागे लोखंडी कुऱ्हाडीने मारून खुन केल्याचे कबुली दिली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने आरोपी दिनेश उर्फ भुरू यास अटक करून गोरेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अपराध क्रमांक 380/2025, कलम1.03 (1) भारतीय न्याय संहिता – 2023 अन्वये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.