जीएसटीतून नोव्हेंबरमध्ये महिन्यात सरकारच्या तिजोरीत किती कोटी जमा, आकडेवारी समोर


नोव्हेंबर GST संकलन नवी दिल्ली : नोव्हेंबर महिन्यात भारत सरकारच्या तिजोरीत वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून 1.70 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये जीएसटी कलेक्शन 1 .69 लाख कोटी रुपये होते.  गतवर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबरमध्ये जीएसटी कलेक्शन वाढलं आहे. मात्र, ऑक्टोबर 2025 च्या तुलनेत जीएसटी कलेक्शन घटलं आहे.

केंद्र सरकारच्या सूचनेनंतर जीएसटी परिषदेनं 22 सप्टेंबरपासून वस्तू आणि सेवा कराच्या स्लॅबमध्ये बदल केले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि दिवाळी सारखे सण होते. त्या काळात लोकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यानं सरकारला जीएसटीच्या रुपात मोठी रक्कम मिळाली होती. ऑक्टोबरमध्ये सरकारला जीएसटीतून 1.96 लाख कोटी रुपये मिळाले होते. नोव्हेंबर महिन्यात खरेदी कमी झाल्यानं वस्तू आणि सेवा करातून मिळणारी रक्कम देखील कमी झाली आहे.

नोव्हेंबरमध्ये सकल देशांतर्गत उत्पन्न  2.3 टक्क्यांनी कमी होत  124299 कोटी रुपये झालं आहे. जीएसटी दरातील कपातीनंतर हे बदल झाले आहेत. सीजीएसटी 34843 कोटी रुपये, राज्याचा जीएसटी 42522 कोटी आणि इंटिग्रेटेड जीएसटी 46934 कोटी रुपये जमा झाला आहे.

आयातीमुळं करात वाढ

नोव्हेंबर महिन्यात आयातीतून उत्पन्न 10.2 टक्क्यांनी वाढून 45976 कोटी रुपये झालं आहे. त्यामुळं एकूण सकल जीएसटी महसूल 170276 कोटी रुपये झाला आहे. जो नोव्हेंबर 2024 च्या तुलनेत 0.7 टक्के अधिक आहे. रिफंडचा विचार केला तर देशांतर्गत रिफंड 8741 कोटी रुपये आहे. तर, निर्यातीचा विचार केला तर जीएसटी रिफंड 9464 कोटी कोटी रुपये आहे.

दोन्ही एकत्र केल्यास नोव्हेंबरमधील जीएसटी रिफंड 18196 कोटी रुपये आहे. रिफंड समायोजित केल्यानंतर देशांतर्गत जीएसटी महसूल 1.5 टक्क्यांनी घटून 115558 कोटी रुपये होतो. निर्यात आणि आयातीमधील नेट कलेक्शन 11.6 टक्क्यांनी वाढलं आहे.  ते 36521 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2025 मधील नेट जीएसटी 7.3 टक्क्यांनी वाढून 12.79 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

सेस कलेक्शनमध्ये घसरण

नोव्हेंबर 2025 मध्ये कॉम्पेनसेशन सेस कलेक्शनमध्ये घसरण झाली आहे. देशांतर्गत सेस कलेक्शन गेल्य वर्षीच्या तुलनेत या महिन्यात 12398 कोटी रुपयांवरुन कमी होऊन 4737 कोटी रुपये झालं आहे. नेट सेस उत्पन्न कमी होऊन 4006 कोटी रुपये राहिलं आहे.

जीएसटी कलेक्शनमध्ये कोणतं राज्य आघाडीवर?

नोव्हेंबर 2025 मध्ये जीएसटी कलेक्शनमध्ये राज्यवार विश्लेषण पाहिलं असता राज्यांची कामगिरी संमिश्र राहिली. केरळ राज्य सकारात्मक ग्रोथ चार्टमध्ये सर्वात पुढं राहिलं. केरळमध्ये एसजीएसटीमध्ये 7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. महाराष्ट्रात एसजीएसटीत 3 टक्क्यांची वाढ दिसून आली. बिहारमध्ये 1 टक्क्यांची वाढ झाली आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.