जयंत पाटलांवर गलिच्छ शब्दात टीका, देवेंद्र फडणवीसांनी टोचले कान; आता गोपीचंद पडळकरांची नरमाईची
सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जत विधानसभा मतदारसंघात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याविरोधात वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. पडळकरांच्या या विधानावरून शरद पवार गट आक्रमक झाला असून, पक्षप्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. पडळकरांच्या वक्तव्यावरून शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना थेट फोन करून नाराजी नोंदवली. त्यानंतर फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं की, “गोपीचंद पडळकरांनी केलेलं विधान योग्य नाही. कोणाच्याही वडिलांबाबत किंवा कुटुंबाबद्दल टिप्पणी करणे योग्य ठरत नाही. मी स्वतः त्यांच्याशी बोललो असून त्यांना हे सांगितलं आहे.”तसेच फडणवीस म्हणाले, “शरद पवारांचा मला फोन आला होता. मी त्यांनाही आश्वासन दिलं की अशा प्रकारच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही.” या प्रतिक्रियेनंतर देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना फोन देखील केल्याचं समोर आलं आहे.
फडणवीस यांचा मला फोन आला
खुद्द भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला होता. यासंदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना त्यांनी मला दिली आहे. मी त्यांच्या सूचनेचे पालन करेन. फडणवीस यांनी मला ज्या सूचना दिल्या आहेत त्या मी पाळणार आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले होते? (What Gopichand Padalkar say?)
गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात बोलताना, जयंत पाटील यांच्यावर गलिच्छ शब्दात टीका केली होती. जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. दर आठ दिवसाला हा आपण किती बिनडोक आहे हे जयंत पाटील सिद्ध करतोय. गोपीचंद पडळकर जयंत पाटलासारखा भिकाऱ्याची औलाद नाही. कार्यक्रम घेण्याची धमक आपल्यामध्ये आहे. हा जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद नसणार आहे. काहीतरी गडबड आहे, अशी पातळी सोडून टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. जयंत पाटलांनी मला एका कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला. याने महाराष्ट्र कसा चालवला, जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. दर आठ दिवसाला हा आपण किती बिनडोक आहे हे जयंत पाटील सिद्ध करतोय. फंडाबाबत आमदार पत्र देऊ शकतो. त्या व्यतिरिक्त आमदाराचा आणि कंत्राटदाराचा काही संबंध येत नाही. जयंत पाटलाचे काम फक्त गोपीचंद पडळकरला बदनाम करण्याचं आहे. पण मी काय आता आलोय का? असे अनेक अंगावर घेऊन आलोय. या प्रस्थापितांच्या सत्ताकारणामध्ये दोन-दोन महिने मी जेलमध्ये जाऊन आलोय. जतमध्ये जयंत पाटलांनी माणसे पाठवली. गोपीचंद पडळकरांनी कोणत्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का याची माहिती घेतली. जर मी कुणाकडून पैसे घेतले असतील तर खंडणीचा गुन्हा दाखल करता येतो का पाहिलं. पण हा गोपीचंद पडळकर जयंत पाटलासारखा भिकाऱ्याची औलाद नाही. कार्यक्रम घेण्याची धमक आपल्यामध्ये आहे. हा जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद नसणार आहे. काहीतरी गडबड आहे, असं विधान गोपीचंड पडळकर यांनी केलं होतं.
आणखी वाचा
Comments are closed.