विधानभवन हाणामारी प्रकरण! नितीन देशमुख आणि सर्जेराव टकलेंना जामीन मंजूर
मुंबई : विधानभवनाच्या लॉबीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांना मारहाण झाली होती. दरम्यान, या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी सर्जेराव बबन टकले (37) आणि नितीन हिंदुराव देशमुख (41) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली होती. हाणामारी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांना जामीन मंजूर झाला आहे.
प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या जातमूचलक्यावर दोघांची सुटका
प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या जातमूचलक्यावर दोघांची सुटका करण्यात आली आहे. सोमवारी कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावताच दोघांनीही जामीनासाठी अर्ज केला होता. विधानभवनात झालेल्या हाणामारीनंतर गुरुवारी रात्री दोघांना अटक करण्यात आली होती. शुक्रवारी दोघांनाही कोर्टात हजर केले असता कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
दरम्यान, आज सर्जेराव बबन टकले आणि नितीन हिंदुराव देशमुख या दोघांनाही आज मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आझाद मैदान येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर केले होते. या दोघांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पोलिसांनी दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळण्याची मागणी कोर्टात केली होती. पोलिसांनी आरोपींना सीसीटिव्ही दाखवले तर इतर आरोपींची ओळख पटवणे अद्याप बाकी आहे. मात्र, आरोपी सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चार दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.
विधानसभा अध्यक्षांच्या सूचनेनंतर आव्हाड आणि पडळकरांनी व्यक्त केली होती दिलगिरी
दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमधील वादावर विधानसभा अध्यक्षांनी कारवाईला केली होती. विधिमंडळ सभागृह सुरक्षा समितीच्या अहवालानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही आमदारांनी खेद व्यक्त करावा, अशा सूचना विधानसभेत दिल्या होत्या. आमदार पडळकर आणि आमदार आव्हाड यांच्याशी संबंधित सर्जेराव बबन टकले आणि नितीन हिंदुराव देशमुख यांच्यावर फौजदारी करण्यात येत असल्याचे देखील नार्वेकर यांनी सांगितले होते. तर विधानसभा अध्यक्षांच्या सूचनेनंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात खेद बाळगत करत दिलगिरी व्यक्त केली होती.
महत्वाच्या बातम्या:
Maharashtra Assembly Clash : विधानभवन राडा प्रकरणात मोठी अपडेट, देशमुख अन् टकलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, आणखी तीन जण पोलिसांच्या रडारवर
आणखी वाचा
Comments are closed.