माझी आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे, पण धर्मांतराबाबत चुकीच्या गोष्टीला विरोध करणारच; गोपीचंद पडळक
गोपीचंद पडलकर: माझी आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे. सेवाभाव दाखवून धर्मांतराच्या बाबतीत चुकीच्या गोष्टीला विरोध करत राहू, असे वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केले आहे. सांगलीत बाळासाहेब गलगले फाउंडेशनच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांना ‘धर्मरक्षक’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमातून ते बोलत होते.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, ख्रिश्चन समाजाने राज्यभर माझ्या विरोधात मोर्चे काढून माझी आमदारकी गेली पाहिजे अशी मागणी केली. मला याबाबतीत मुंबई हायकोर्टाची नोटीस देखील आलीय. पण तुम्ही गाव गाड्यातील गरीब लोकांना सेवाभाव दाखवून धर्मांतराच्या बाबतीत ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. त्याला आम्ही विरोध करत राहू. भले माझी आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे. मला याच्याशी काही देणेघेणे नाही, असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठणकावून सांगितले.
हिंदूंवर अन्याय होत असेल तर…
गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, आजही समाजात मुघल प्रवृत्तीची लोक आहेत आणि त्यांना आपण ठेचून काढायचे आहे. एकीकडे सर्वधर्म समभाव म्हणायचे मग हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतरण का केले जातेय, असा माझा प्रश्न आहे. पण हिंदूंवर जर कुठे अन्याय होत असेल तर त्याबाबत मी नेहमी आक्रमक भूमिका घेणार असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.
गोपीचंद पडळकरांचा सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल
दरम्यान, मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो, मग तुम्हाला अडचण काय आहे? असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. या कार्यक्रमातून गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. माझ्या पांडुरंगाला मटण चालते असे एक विधान आले. मात्र, आमच्या पांडुरंगाला तर मटण चालत नाही. ज्या देवाला मटण चालतेय असा तुमचा कोणता देव आहे. मग तो मशिदीत असावा आणि त्यांचा तो देव असावा, त्याला ते देव मानत असतील किंवा त्या देवाला मटण चालत असेल. आज वारकऱ्यांच्या मनाच्या खच्चीकरणासाठी अशी विधाने केली जात आहेत का? आज मताच्या राजकारणासाठी कोण कुठल्या थराला जाईल याचा नेम नाही, असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळेंवर केला आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.