आरसीबी 2025 चं आयपीएल जिंकेल का? एलन मस्कच्या ग्रोक एआयचं भन्नाट उत्तर
आरसीबी वर ग्रोक एआय नवी दिल्ली : उद्योगपती एलन मस्क यांच्या मालकीच्या एक्स या प्लॅटफॉर्मचा एआय बेस्ड चॅटबॉट असलेल्या ग्रोकला नेटकऱ्यांनी विविध प्रश्न विचारले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं ग्रोकनं दिली आहेत. ग्रोक चॅटबॉटला नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं देखील शेअर केली आहेत.एका नेटकऱ्यानं ग्रोकला प्रश्न विचारला की आरसीबीला 18 व्या आयपीएलचं विजेतेपद मिळेल का? त्यावर ग्रोकनं दिलेल्या उत्तराची चर्चा होत आहे.
विराट कोहलीनं आतापर्यंत 17 आयपीएलमध्ये आरसीबीचं प्रतिनिधीत्तव केलं आहे. 18 व्या आयपीएलसाठी आरसीबीनं 17 मार्चला अनबॉक्स इवेंट आयोजित केला आहे. ज्यामध्ये चाहते मोठ्या संख्येनं पोहोचण्याची शक्यता आहे. आरसीबीला एकदाही विजेतेपद मिळालेलं नाही. मात्र, विराट कोहलीमुळं या टीमचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहे. ग्रोक एआयला एका यूजरनं आयपीएल 2025 चं विजेतेपद आरसीबीला मिळेल का असं विचारलं?
ग्रोक एआय नेमकं काम कसं करतं?
Grok AI हा एक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बेस्ड चॅटबॉट आहे. याची निर्मिती XAI नं केली आहे. ग्रोक एआयला यूजर्स टेक्स मेसेजच्या माध्यमातून प्रश्न विचारले. एक्सचे यूजर्स ग्रोकला टॅग करुन प्रश्न विचारु शकतात. काही यूजर्स कामा संदर्भातील प्रश्न विचारत आहेत, काही यूजर्स अजब प्रश्न विचारत आहेत. या अजब प्रश्नांची उत्तर देखील ग्रोककडून दिली जात आहेत. आयपीएल आणि आरसीबीच्या चाहत्यांकडून देखील ग्रोकला प्रश्न विचारले जात आहेत. आरसीबी 18 वं आयपीएल जिंकेल का असा प्रश्न ग्रोक एआयला विचारण्यात आला. यावर ग्रोक एआयनं काय म्हटलं जाणून घेऊयात.
मुलांनी ग्रोक एआय?
आरसीबीला 2025 चं आयपीएल जिंकणं अवघड दिसतं. या संघानं 2009,2011 आणि 2016 तीनवेळा अंतिम फेरीचा सामना खेळला मात्र प्रत्येकवेळी त्यांचा पराभव झाला. ऑक्शननंतर मुंबईचा संघ मजबूत आहे. Dafabet ऑडस नुसार विराट कोहली सारखा दिग्गज खेळाडू आरसीबीकडे आहे. मात्र, आरसीबीच्या फलंदाजी आणि गोलंदाजीत उणिवा आहेत. काय वाटतं का आरसीबी यावेळी ते शक्य करु शकेल.
हॅलो @ग्रोक यावेळी आरसीबी आयपीएल ट्रॉफी जिंकेल?
– खान (@pust24606) मार्च 16, 2025
आरसीबी यावेळी आयपीएलचा उद्घाटनाचा सामना खेळणार आहे. ईडन गार्डन्स वर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ही मॅच 22 मार्चला होणार आहे. आरसीबीनं यावेळी कर्णधारपद रजत पाटीदारकडे दिलं आहे.
इतर बातम्या :
अधिक पाहा..
Comments are closed.