गुजरात: वडोदरा येथे उभ्या असलेल्या ट्रकला बसची धडक, 6 जण ठार, 26 जण गंभीर जखमी

वडोदरा, १७ जून. गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात बुधवारी पहाटे राजस्थानहून सुरतला जाणाऱ्या एका खासगी बसची महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 26 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडोदरा-हलोल महामार्गावरील कोटंबी गावाजवळ पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी वडोदरा येथील सयाजी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की बसच्या पुढील भागाचे पुर्णपणे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानहून सुरतला जाणारी खासगी लक्झरी बस वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमजवळ येताच ट्रकच्या मागून धडकली. धडक होताच बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये आरडाओरडा झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

वडोदरा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सुशील अग्रवाल यांनी सांगितले की, राजस्थानहून सुरतला जाणारी लक्झरी बस ट्रकच्या मागील बाजूस आदळली. ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता आणि चालक टायरचे प्रेशर तपासत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या बसने त्याला धडक दिली.

बसमधील बहुतांश प्रवासी राजस्थानमधील होते.

अग्रवाल म्हणाले, 'टक्कर एवढी भीषण होती की बसचा पुढील भाग पूर्णपणे खराब झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये प्रवास करणारे बहुतांश प्रवासी राजस्थानचे होते.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबविण्यात आले. बचाव कार्यादरम्यान गॅस कटरसह अनेक साधनांनी बसचे काही भाग कापून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने वडोदरा येथील सयाजी रुग्णालयात हलवण्यात आले.

Comments are closed.