नोकरीवरून काढल्याने एच1बी व्हिसाधारक चिंतेत, 60 दिवसांत दुसरी नोकरी शोधावी लागणार
गेल्या अनेक वर्षांपासून कोडिंग आणि टेक्नोलॉजी कौशल्यात पारंगत असल्याने अमेरिकेत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘मेटा’ कंपनीने नुकतेच आठ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना 60 दिवसांत दुसरी नोकरी शोधावी लागेल, अन्यथा एच 1 बी व्हिसाच्या नव्या नियमामुळे अमेरिका सोडावी लागणार आहे. यामुळे कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे.
मेटा, अमेझॉन आणि लिंक्डइनसारख्या मोठ्या कंपन्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशनवर फोकस केल्याने कर्मचारी कपात करायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून ‘मेटा’ने एकाचवेळी आठ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. आता या कर्मचाऱ्यांवर एच 1 बी व्हिसाचे संकट ओढवले आहे. नोकरी गेल्यानंतर परदेशी कर्मचाऱ्यांना नवीन नोकरी शोधण्यासाठी केवळ 60 दिवसांचा वेळ मिळतो. जर या काळात नवी नोकरी मिळाली नाही तर अमेरिकन कायद्यानुसार त्या कर्मचाऱ्याला देश सोडावा लागतो.
Comments are closed.