पहिल्या आयपीएल शतकाच्या वाटेवर असताना हार्दिकचा तिलकला सल्ला! म्हणाला, “चेंडूवर लक्ष ठेव …”
आयपीएल २०२६ मध्ये सोमवारी (२० एप्रिल) मुंबई इंडियन्सने आपली पराभवाची मालिका खंडीत केली. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या गुजरात विरुद्धच्या सामन्यात एमआयने ९९ धावांनी विजय मिळवला. यामध्ये एमआयने सर्व विभागांमध्ये उत्तम कामगिरी केली. तिलक वर्माचे पहिले आयपीएल शतक, जसप्रीत बुमराह फॉर्ममध्ये परतला आणि अश्वनी कुमारची हंगामाच्या पहिल्याच सामन्यात जबरदस्त गोलंदाजी प्रदर्शन. या विजयानंतर एमआयचा कर्णधार हार्दिक पांड्याने तिलक आणि त्यांच्यात क्रिजवर असताना काय बोलणे झाले ते सांंगितले.
हा सामना एमआयसाठी जिंकणे महत्त्वाचे होता. या निकालामुळे त्यांच्या पराभवाची मालिका संपुष्टात आली. अहमदाबादच्या नरेंद्री मोदी स्टेडियमवर एमआयला जीटीविरुद्ध नेहमीच संघर्ष करावा लागला आहे, मात्र सोमवारी सामना जिंकत त्यांनी इतिहास रचला. येथे त्यांचा जीटीविरुद्ध हा पहिलाच विजय आहे. यामध्ये एमआयला ज्या खेळाडूकडून उत्तम खेळीची अपेक्षा होती, त्याने ती केली. तिलकच्या शतकी खेळीबाबत हार्दिक म्हणाला की ही खेळी आश्चर्यापेक्षा, त्याच्या मते विशेष चेंडू फटकावण्याची क्षमता असलेल्या खेळाडूच्या बहुप्रतिक्षित खेळीचे प्रतीक अधिक होते.
हार्दिक पुढे म्हणाला, “खेळपट्टीवर असताना त्याला मी केवळ एकच संदेश देत राहिलो, की चेंडू कसाही येऊ दे त्यावर नीट लक्ष ठेव आणि शॉट मार, कारण माझा विश्वास होता की त्याच्या बॅटमधून निघणारा प्रत्येक शॉट खरोखरच खूप खास असतो. त्याला अधिक सल्ल्याची गरज नाही.”
या सामन्यात एमआयची एकवेळ स्थिती ६ षटकानंतर ४६ धावांवर ३ विकेट्स अशी होती. हे पाहून हार्दिकने म्हटले की तेव्हा त्या क्षणात तो पूर्णपणे हरवून गेला होता. त्याने तिलकसोबत टाईम-आऊट दरम्यान काही संभाषण केले. त्याबद्दल तो म्हणाला, “जबाबदारी पार पाडण्याची हीच योग्य वेळ आहे. मला वाटतं मी त्याला दोन-तीन वेळा मोठ्याने ओरडलो असेल त्यामुळे मला चक्करही आल्यासारखे वाटले. तेव्हा संघासाठी, तिलकसाठी आणि एक कर्णधार म्हणून ती परिस्थिती बदलण्यासाठी त्या उर्जेची खूप आवश्यकता होती.”
तिलक जेव्हा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, तेव्हा त्याने सुरूवातीला संयमी खेळी केली. त्याने १९ चेंडूत २२ धावा काढल्या होत्या आणि ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते, नंतर त्याने २३ चेंडूत ८२ धावा ठोकल्या. तसेच त्याने हार्दिकसोबत पाचव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारीही केली. जेव्हा मधल्या षटकांमध्ये एमआयच्या धावांचा वेग वाढला तेव्हा सामन्याची स्थिती बदलताना दिसली. त्यांनी २० षटकात ५ विकेट्स गमावत १९९ धावसंख्या उभारली.
प्रत्युत्तरात जीटी १५.५ षटकात सर्व विकेट्स गमावत केवळ १०० धावा करू शकला. त्यांच्याकडून सर्वाधिक धावा वॉशिंग्टन सुंदरने केल्या. त्याने १७ चेंडूत ५ चौकारांच्या सहाय्याने २६ धावा केल्या. तसेच एमआयच्या गोलंदाजांनीही कमालीची कामगिरी केली. अश्वनी कुमारने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तिलक सामनावीर ठरला. या विजयानंतर एमआय गुणतालिकेत सातव्या स्थानावर आला आहे.
Comments are closed.