हे 2 खेळाडू ठरू शकतात आयुष म्हात्रेचे परफेक्ट रिप्लेसमेंट; अश्विनने सीएसकेला दाखवला मार्ग

IPL 2026: ५ वेळा विजेतेपद मिळवणारा चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ सध्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे. या हंगामातील लिलावात संघाने युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला होता, मात्र तरीही संघाची कामगिरी चढ-उतारांची राहिली आहे. खेळाडूंच्या दुखापती ही या हंगामात संघासाठी मोठी समस्या ठरली असून, आतापर्यंत ३ मोठे खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. नुकताच १८ वर्षांचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे बाहेर पडल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे. अशा स्थितीत संघ आता त्याच्या जागी नवीन खेळाडूच्या शोधात असेल. फ्रँचायझीचा माजी खेळाडू आर. अश्विनने म्हात्रेचा पर्याय म्हणून २ युवा खेळाडूंच्या नावांचा सल्ला दिला आहे.

च्याआर. अश्विनने चेन्नईच्या संघाला मार्ग दाखवताना २ पर्याय सुचवले आहेत. पहिला पर्याय म्हणजे, संघ आरसीबीच्या (RCB) ताफ्यात असलेल्या अंडर-१९ विश्वचषक विजेत्या विहान मल्होत्राला आपल्या संघात घेऊ शकतो. तो सध्या आरसीबीचा भाग आहे, पण ‘लोन विंडो’ (Loan Window) अंतर्गत तो सीएसकेमध्ये येऊ शकतो. त्याच्याकडे जबरदस्त प्रतिभा असून ७ सामने पूर्ण होण्यापूर्वी फ्रँचायझी त्याला संघात सामील करून घेऊ शकते.

च्यायासोबतच, संघ युवा प्रतिभावान फलंदाज अभिज्ञान कुंदू यालाही संघात स्थान देऊ शकतो. मिनी लिलावात त्याला कोणीही खरेदीदार मिळाला नव्हता, त्यामुळे सीएसके आयुष म्हात्रेच्या जागी त्याला संधी देऊ शकते.

च्याआयुष म्हात्रे या हंगामात चेन्नई सुपर किंग्ससाठी आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने खेळलेल्या ६ सामन्यांत १७७.८७ च्या स्ट्राईक रेटने २०१ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश आहे. २०२५ मध्ये वैभव सूर्यवंशी पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळायला उतरला होता. त्याने ७ सामन्यांत २४० धावा केल्या होत्या आणि त्याची सरासरी ३४.२८ इतकी होती. आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यांत त्याने संघासाठी एकूण ४४१ धावा केल्या आहेत.

Comments are closed.