पांड्या-कार्तिकचं भर मैदानात कडाक्याचं भांडण, हार्दिक संतापाच्या भरात बोलत राहिला, सगळे प्रेक्ष

हार्दिक पांड्या आणि मुरली कार्तिकची झुंज : हार्दिक पांड्या सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत खेळताना दिसत आहे. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (23 जानेवारी) रायपूर येथे खेळला गेला. मात्र या सामन्यापूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला, ज्यामध्ये हार्दिक पांड्या आणि माजी भारतीय क्रिकेटपटू मुरली कार्तिक यांच्यात जोरदार वाद झाल्याचे दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये हार्दिक सरावासाठी मैदानात प्रवेश करताना दिसतो. मैदानावर पोहोचताच त्याची मुरली कार्तिकसोबत चर्चा सुरू होते. ही चर्चा हळूहळू अधिक तीव्र होत जाते आणि हार्दिक संतापाच्या भरात बोलत राहिला, सगळे प्रेक्षक पाहतच राहिले.

पांड्या-कार्तिकचं भर मैदानात कडाक्याचं भांडण…

हा व्हिडिओ शेअर करताना सोशल मीडियावर दावा करण्यात आला की रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी हार्दिक पांड्या मुरली कार्तिकवर चांगलाच चिडलेला दिसला. कॅप्शनमध्ये “हार्दिक आणि मुरली कार्तिक यांच्यात मोठा लफडा झाला” असे लिहिले आहे. मात्र, या वादाबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

बराच वेळ सुरू होती चर्चा

विशेष म्हणजे, व्हिडिओमध्ये हार्दिक आणि मुरली कार्तिक यांच्यात बराच वेळ संवाद सुरू असल्याचे दिसते. सुरुवातीला हार्दिक बोलत-बोलत थोडा दूर जातो, त्यानंतर दोघे पुन्हा एकमेकांच्या जवळ येऊन चर्चा करताना दिसतात. त्यामुळे हा केवळ चर्चा होती की खरोखरच वाद, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध हार्दिकची कामगिरी

नागपूर येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात हार्दिक पांड्याने अष्टपैलू कामगिरी केली होती. त्याने फलंदाजी करताना 25 धावा केल्या, तसेच गोलंदाजीत 1 विकेट घेतली होती. दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही, मात्र गोलंदाजी करताना त्याने पुन्हा एक विकेट आपल्या नावावर केली.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, शुक्रवारी रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, न्यूझीलंडने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत कर्णधार मिशेल सँटनरच्या नाबाद 47 आणि रचिन रवींद्रच्या 44 धावांच्या मदतीने 20 षटकांत सहा विकेट्स गमावून 208 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 15.2 षटकांत तीन विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. संजू सॅमसननंतर दुसरा सलामीवीर अभिषेक शर्मा दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. 6 धावांवर दोन विकेट्स पडल्या होत्या, सामना निसटतोय असं वाटलं. पण ईशान–सूर्यकुमारने गेम फिरवला. भारतीकडून इशान किशनने 76 आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद 82 धावांची सामना जिंकणारी खेळी केली.

हे ही वाचा –

VIDEO : वर्ल्डकपच्या तोंडावर कॅप्टनची बॅट अखेर तळपली, सामना संपताच सूर्याने या व्यक्तीच्या पायावर लोटांगण घातलं, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.