हार्दिक पांड्याविरोधात पहिली अॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं महागात
हार्दिक पंड्या माहिका शर्मा: न्यूझीलंडला पराभूत करुन पुन्हा आयसीसी टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2026) जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. मात्र भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याची गर्लफ्रेंड महिका शर्मा (Mahika Sharma) यांचं मैदानातील सेलिब्रेशनाची सर्वत्र चर्चा झाली. हार्दिक पांड्याच्या खांद्यावर तिरंगा, तर गळ्यात विश्वचषकाचं मेडल असून यावेळी तो महिकासोबत मैदानातील बक्षीस वितरणासाठी उभारण्यात आलेल्या स्टेजवर झोपला होता. यावरुन सोशल मीडियावरही संताप व्यक्त केला जात होता. आता सदर प्रकरणावरुन हार्दिक पांड्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
मैदानावर भारतीय ध्वजात गुंडाळून महिका शर्मासोबत सेलिब्रेशन करणं हार्दिक पांड्याला महागात (Hardik Pandya Mahika Sharma Celebration) पडलं आहे. पुणे येथील वकील वाजिद खान यांनी हार्दिक पांड्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात वाजिद खान यांचा एफआयआर स्वीकारण्यात आला आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने त्याच्या मैत्रिणीसोबत भारतीय ध्वजात गुंडाळून नाच केला आणि नंतर झोपला, ज्यामुळे भारतीय ध्वजाचा अपमान झाला, असा दावा वाजिद खान यांनी केला आहे.
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने काय काय केलं? (Hardik Pandya Mahika Sharma Video)
विश्वचषक जिंकल्यानंतर महिका हार्दिक पांड्यासोबत मैदानात दिसली. हार्दिक पांड्या आणि महिका दोघंचं मैदानात फिरत होते, नाचत होते. महिकाने यावेळी हार्दिक पांड्याला अनेकदा मिठी मारली. तसेच हार्दिकच्या गालावर किसही केली. महिकाने जेव्हा हार्दिक पांड्याला किस केली, त्यावेळी मैदानातील ग्राऊंड स्टाफ दोघांकडे बघत बसले. तसेच हार्दिक आणि महिकाचे आणखी काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्याच्या खांद्यावर तिरंगा, तर गळ्यात विश्वचषकाचं मेडल असून यावेळी तो महिकासोबत मैदानातील बक्षीस वितरणासाठी उभारण्यात आलेल्या स्टेजवर झोपल्याचं पाहायला मिळत आहे. हार्दिक आणि महिकाच्या या कृत्यावरुन सोशल मीडियावर चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.