IPL 2026 नंतर हार्दिक पांड्याकडून कर्णधारपद काढून घेणार? मुंबई इंडियन्स मॅनेजमेंटने दिलं उत्तर
आयपीएल (IPL) 2026 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी अत्यंत निराशाजनक होत आहे. संघाच्या या खराब प्रदर्शनासाठी अनेकजण कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik pandya) जबाबदार धरत आहेत. त्यामुळे आता हार्दिककडून मुंबईचे कर्णधारपद काढून घेतले जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, टीम मॅनेजमेंटने यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे.
हार्दिक पांड्याने 2022 मध्ये गुजरात टायटन्सला त्यांच्या पहिल्याच हंगामामध्ये चॅम्पियन बनवले होते. त्यानंतर 2024 मध्ये तो पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये परतला, पण यावेळी त्याने रोहित शर्माची जागा घेत थेट कर्णधारपद स्वीकारले. रोहितने मुंबईला 5 वेळा विजेतेपद मिळवून दिले होते, मात्र हार्दिकला कर्णधार म्हणून मुंबईसाठी अजूनपर्यंत फारसे यश मिळवता आलेले नाही.
रिपोर्टनुसार, टीम मॅनेजमेंट अजूनही हार्दिक पांड्याला पूर्ण पाठिंबा देत आहे. मॅनेजमेंटच्या मते, संघाच्या पराभवाला हार्दिकचे नेतृत्व जबाबदार नसून, आयपीएलमध्ये बदलत चाललेल्या खेळाच्या पद्धतीशी जुळवून घेण्यात टीम कमी पडत आहे. यावरून एक विचार गोष्ट स्पष्ट झाली आहे की, मुंबईच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले जाणार नाही. तो पुढील हंगामात, म्हणजेच IPL 2027 मध्येही मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसेल.
हार्दिकने त्याच्या आयपीएल करिअरमध्ये आतापर्यंत 160 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये, 148 डावांत 27.83 च्या सरासरीने आणि 146.35 च्या स्ट्राईक रेटने 2895 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 अर्धशतकांचा समावेश असून 91 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. 115 डावांत त्याने 82 विकेट्स घेतल्या आहेत. 36 धावांत 5 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. हार्दिक पांड्या 2015 पासून आयपीएल खेळत असून त्याने मुंबई इंडियन्सकडूनच आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
Comments are closed.