INDvsZIM: हरमनप्रीत कौरचा शतकी धमाका! रोहित शर्मा-सचिन तेंडुलकरच्या खास यादीत एंट्री, मिताली राजलाही मागे…
झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. टी20 मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. यामधील दुसरा सामना रविवारी (25 ऑक्टोबर) वडोदरा येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताची माजी कर्णधार हरमनप्रीत कौरने शतक झळकावले आहे. कर्णधारपद सोडल्यानंतर हे तिचे पहिले शतक. ही उल्लेखनीय कामगिरी केल्याने तिने भारताची माजी कर्णधार मिताली राजला मागे टाकले. त्याचबरोबर रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर यांच्या खास यादीत प्रवेश केला.
या सामन्यात हरमनप्रीतने 121 चेंडूंत 15 चौकारांच्या सहाय्याने 126 धावा केल्या. तिचे हे कारकिर्दीतील आठवे एकदिवसीय शतक ठरले. त्यामुळे तिने मितालीला मागे टाकले. मितालीने 7 एकदिवसीय शतके केली.
भारतीय महिलांसाठी सर्वाधिक एकदिवसीय शतके
14 – स्मृती मानधना
8 – हरमनप्रीत कौर
७ – मिताली राज
3 – पुनम राऊत
3 – जेमिमाह रॉड्रिग्ज
३ – प्रतिका रावल
हरमनप्रीत एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारी पाचवी सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू ठरली.
एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारे सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू
३९ वर्षे १५३ दिवस – रोहित शर्मा
38 वर्षे 327 दिवस – सचिन तेंडुलकर
38 वर्षे 113 दिवस – सुनील गावस्कर
37 वर्षे 326 दिवस – विराट कोहली
37 वर्षे 231 दिवस – हरमनप्रीत कौर
३७ वर्षे १८५ दिवस – मोहिंदर अमरनाथ
या सामन्यात भारताकडून आणखी एक शतकी खेळी आली. दीप्ती शर्माने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले. तिने तब्बल नऊ वर्षांनंतर या प्रकारामध्ये शतक केले आहे. याआधी तिने आयर्लंडविरुद्ध 2017 मध्ये शतक झळकावले होते.
दिप्ती आणि हरमनप्रीत (दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ZIM विरुद्ध हरमनप्रीत कौरचे शतक, रोहित शर्मा सचिन तेंडुलकरसह एलिट यादीत सामील झाले, मिताली राजला मागे टाकले)
Comments are closed.