हरमनप्रीत सिंगकडे संघाचे कर्णधारपद, हॉकी वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानचा संघ जाहीर
१५ ते ३० ऑगस्टदरम्यान बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये होणाऱ्या एफआयएच पुरुष हॉकी विश्वचषकासाठी हॉकी इंडियाने २० सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समतोल साधत निवडलेल्या या संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा हरमनप्रीत सिंग करणार आहे.
अनुभव आणि युवा जोशाचा संगम
गोलरक्षक म्हणून मोहित एचएस आणि सूरज करकेरा यांची निवड करण्यात आली आहे. बचावफळीत जरमनप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित आणि यशदीप सिवाच यांचा समावेश आहे. मध्यफळीत मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग आणि विवेक सागर प्रसाद ही अनुभवी तिकडी संघाची धुरा सांभाळणार असून त्यांना नीलकांता शर्मा, युवा खेळाडू राजिंदर सिंग आणि आदित्य अर्जुन लालागे यांची साथ लाभणार आहे.
आक्रमणाची जबाबदारी मनदीप सिंग, दिलप्रीत सिंग, अभिषेक, सुखजीत सिंग आणि शिलानंद लाक्रा यांच्यावर सोपविण्यात आली आहे. हिंदुस्थानी संघाचा समावेश पूल ‘डी’मध्ये इंग्लंड, पाकिस्तान आणि वेल्स यांच्यासोबत झाला आहे. हिंदुस्थानचे सर्व साखळी सामने नेदरलँड्समधील अमस्टेलव्हीन येथे खेळवले जाणार आहेत.
निवड झालेला पुरुष हॉकी संघ
गोलरक्षक – मोहित एचएस, सूरज करकेरा.
बचावपटू – जरमनप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित, यशदीप सिवाच.
मिडफिल्डर – राजिंदर सिंग, आदित्य अर्जुन लालगे, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, नीलकंता शर्मा, विवेक सागर प्रसाद.
हल्लेखोर – दिलप्रीत सिंग, शिलानंद लाक्रा, सुखजीत सिंग, मनदीप सिंग, अभिषेक.
Comments are closed.