हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला

मुंबई : राज्यात शिवजयंतीची जल्लोष आणि उत्साहात तयारी सुरू असून शिवप्रेमी, शिवभक्त तयारीला लागले आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना शिवाजी महाराजांबद्दल (shivaji maharaj) केल्याच्या वक्तव्यावरुन चांगलाच वाद सुरू झाला. भाजप नेते, आमदारांकडून हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan sapkal) यांच्यावर टीका करत काँग्रेसचा खरा चेहरा हाच आहे, काही विशिष्ट समुदायाच्या व्होट बँकेसाठी हर्षवर्धन सपकाळ असं बोलतात असेही सत्ताधाऱ्यांनी म्हटले. मात्र, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, भाजपने जाणीवपूर्वक खोडसाळपणा केल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. तसेच, आपल्या वक्तव्याने काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही सपकाळ यांनी म्हटले.

हर्षवर्धन सकपाळ यांनी शिवाजी महाराजांबद्दल गौरवोद्गार काढताना टिपू सुलतानच्या कार्याचेही कौतुक केले होते. तसेच, शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानसोबत केल्याचं दिसून आलं. मात्र, भाजपने खोडसाळपणा करत चुकीच्या पद्धतीने माझे वक्तव्य पसरवल्याचे सांगत आपल्या वक्तव्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवप्रेमीप्रती केली दिलगिरी व्यक्त केली आहे.

दोन दिवसांपूर्वी हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान सोबत केली या वक्तव्यामुळे राज्यभरात गदारोळ निर्माण झाला होता. त्यानंतर, हर्षवर्धन सपकाळ यांना धमक्याही मिळाल्या होत्या तर काही शिवप्रेमी थेट हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवासस्थानी सुद्धा दाखल झाले होते. त्या अनुषंगाने हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुक पोस्ट करत “भाजपचा तीव्र शब्दात निषेध करत त्यांच्या गलिच्छ व खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्.या त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो, माझ्या शब्दाचा गैरवापर केल्याबद्दल शिवप्रेमीं प्रति दिलगिरी व्यक्त करतो व कुणाच्याही भावनांना ठेच पोहोचण्याचा माझा हेतू नव्हता” अशा प्रकारची फेसबुक पोस्ट सपकाळ यांनी केली आहे. तसेच, आपल्या पोस्टमध्ये अंभागातील काही ओळीही दिल्या आहेत. भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी । असे तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळीतून सपकाळ यांनी संदेश दिलाय.

मी अशा कडक गडगडाटातून मोडतो

भले तरि देऊं कासेची लंगोटी ।

नाठाळाचे माथी हाणू काठी ।

मायबापाहूनि बहु मायावंत ।

करूं घातपात शत्रूहूनि ॥

ते अमृत आपल्यासमोर काय गोड आहे?

विष तें बापुडें कडू किती ॥

हेही वाचा

‘ठाणे की रिक्षा’वाला कुणाला कामरा विधानभवनात; सोबत सुषमा अंधारे अन् वकील, अंगावर लक्षवेधी टी-शर्ट

आणखी वाचा

Comments are closed.