अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी ‘हा’ धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजप महायुतील मोठं यश मिळालं असून भाजपने सुमारे 120 नगरपालिकांवर आपला झेंडा रोवला आहे. भाजपच्या राजकीय इतिहासात आजपर्यंत मिळालेलं हे सर्वात मोठं यश आहे, अभूतपूर्व यश भाजपला मिळालं असून आता मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपा महायुती सज्ज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्यावर, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan sapkal) यांनी प्रखर शब्दात टीका केली असून देवेंद्र फडणवीस हे जल्लाद असल्याचं त्यांनी म्हटलं. जे पाशवी बहुमत भाजपला मिळाला आहे, नगरपालिकांमध्ये मिळालेले हे यश अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. कारण, सोबत घेतलेल्या प्रत्येक मित्रपक्षाचा घात करणे हा भाजपचा स्वभाव आहे, असेही सपकाळ यांनी म्हटले.
जे पाशवी बहुमत भाजपला मिळालं आहे, भाजपला नगरपालिकामध्ये मिळालेले हे यश अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. प्रत्येक सोबत घेतलेल्या मित्र पक्षाचा घात करणे हा भाजपचा स्वभाव आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थामधील विजयाच्या निकालानंतर काँग्रेसकडून भाजपवर पहिल्यांदाच वार करण्यात आला. 2029 च्या निवडणुकीत हे दोघेही पक्ष भाजपसोबत दिसणार नाहीत, देवेंद्र फडणवीस एक जल्लाद आहेत. म्हणूनच त्यांच्यातला एक पक्ष विरोधकांशी हातमिळवणी करण्यासाठी निघाला आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर केली.
महापालिकेबाबत स्थानिक नेत्यांना अधिकार
महापालिकेच्या निवडणुकीतील आघाडी संदर्भात स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाला आम्ही अधिकार दिले असून इंडिया अलायन्ससोबतच वंचित बहुजन आघाडी आणि शेतकरी संघटना यांच्यासोबत आमची चर्चा सुरू आहे, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. तसेच, होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा काँग्रेस पक्ष जिंकेल, असा विश्वास देखील सपकाळ यांनी व्यक्त केला.
माणिकराव कोकाटेंना सरकार वाचवतंय
राहुल गांधी यांचे सदस्यत्व काही तासात रद्द होते, सुनील केदार यांची देखील आमदारकी रद्द केली जाते. मात्र रम्मीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या माणिकराव कोकाटे यांची सुरक्षा प्रशासन करताना दिसत आहे. कोकाटेंची सोय होईल अशा वातावरणाची निर्मिती पोलिसांनी केली. तसेच त्यांना बेल मिळावी यासाठी सरकार गप्प बसलं होतं. भारतीय जनता पक्ष हा ना खाऊंगा, ना खाने दूंगा या धर्तीवर काम करत नाही. याउलट, मिल बाटके सब खाओ अशी त्यांची भूमिका आहे. एका मंत्राला वाचवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न हा सत्ताधारी पक्षाचा सुरू आहे, अशीही टीका माणिकराव काकाटे यांनी केली.
हेही वाचा
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
आणखी वाचा
Comments are closed.