शाब्बास…तुम्ही परंपरा जपली! काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका

हर्षवर्धन सपकाळ आणि पंतप्रधान मोदी: इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे इंधन पुरवठा ठप्प होण्याची टांगती तलवार असलेल्या भारताला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी तात्पुरत्या काळासाठी रशियाकडून खनिज तेल (Crude Oil) विकत घेण्याची परवानगी दिली होती. यासंदर्भातील अमेरिकेचे परिपत्रक जारी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (पीएम मोदी) आणि भाजपवर (BJP) विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. एखाद्या दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष भारताला कोणाकडून तेल विकत घ्यायचे, हे कसे काय सांगू शकतो? भारताला आता प्रत्येक गोष्ट करण्यासाठी अमेरिकेची परवानगी घ्यावी लागणार, देशाच्या इतिहासात अशी वेळ कधीची आली नव्हती, असा आरोप विरोधकांनी केला होता. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनीही या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा (Veer Savarkar) एक काल्पनिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये नरेंद्र मोदीच्या पाठीवर ‘तडजोड करणारा’ (Compromised) असा बिल्ला लावला आहे. त्यांच्या हातात अमेरिकेच्या परवानगीचा कागद दिसत आहे. ‘शाब्बास…तुम्ही परंपरा जपली!’, असे सावरकर मोदींना म्हणताना या छायाचित्रात दिसत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची ही फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या टीकेला आता भाजप कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.  (Maharashtra Politics)

यापूर्वीही टिपू सुलतान वादावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा दावा केला होता. ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल खूप चुकीचे लिहले आहे. शिवाजी महाराजांच्या सज्जनपणाला विकृती म्हणण्याचे धाडस सावरकर यांनी केले आहे. ‘स्वराज्य हे स्थापन होणारचं होतं. पण कावळा बसायला आणि डांग तुटायला, त्याप्रकारे शिवाजी महाराज आले’, असे सावरकरांनी त्या पुस्तकात लिहले आहे. असं लिहणारे सावरकर भाजपला चालतात. गोंधळ निर्माण करणे हे भाजपचे धोरण आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले होते.

आणखी वाचा

Harshwardhan Sapkal : गांधीहत्येच्या कटात भगूरचा 60 रुपये पेन्शन घेणारा सहआरोपी होता, हर्षवर्धन सपकाळांची आक्षेपार्ह भाषेत टीका

आणखी वाचा

Comments are closed.