मनसेला सोबत घेतण्याबाबत हर्षवर्धन सपकाळांनी व्यक्त केली होती नाराजी; संजय राऊतांनी थेट काँग्रेस


मुंबई: ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची (Harshwardhan Sapkal) काँग्रेस हायकमांडकडे (Congress high command) तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्यासंदर्भात हर्षवर्धन सपकाळांनी (Harshwardhan Sapkal) मांडलेल्या भूमिकेवरून ही तक्रार केल्याचं कळतंय. मात्र संजय राऊतांनी केलेल्या तक्रारीवरून काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. संजय राऊतांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची (Harshwardhan Sapkal) तक्रार काँग्रेस हायकमांडकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे. हर्षवर्धन सपकाळांनी मनसेबाबत घेतलेल्या भूमिकेवरून तक्रार केल्याची चर्चा आहे. राऊतांनी केलेल्या तक्रारीवरून काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.

Harshwardhan Sapkal : मला दिल्लीला बोलवण्यात आले म्हणून मी तिकडे गेलो

दरम्यान निवडणूक आयोगाला भेटायला गेलेल्या शिष्टमंडळामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव होतं, मात्र ते अनुपस्थित राहिल्याने चर्चा सुरू झाल्या होत्या, त्याबाबतच्या प्रश्नावर सपकाळांनी उत्तर दिलं आहे. मनसेला सोबत घेण्यासंदर्भात हे शिष्टमंडळ नव्हतं. हे शिष्टमंडळ निवडणुकांमधील घोटाळ्यासंदर्भात भेटलं होतं. यामध्ये आघाडी-युतीच्या चर्चा होण्याचा प्रश्न नाही. काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून आमचे लोक त्यात सहभागी झाले मला दिल्लीला बोलवण्यात आले म्हणून मी तिकडे गेलो, अशी माहिती सपकाळांनी दिली आहे.

Harshwardhan Sapkal : कोणाला आघाडीत घ्यायचं नाही यावर दिल्लीत निर्णय होईल

निवडणूक आयोगाकडे रास्त प्रश्न विचारले. ⁠१३ तारखेला रमेश चेन्नीथल यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भुमिका स्पष्ट केली होती. पक्षश्रेष्ठींकडून काहीही बोलले नाहीत. मी पक्षाच्या कामासाठी दिल्लीला गेलो होतो. राहूल गांधी यांनी याआधी ही निवडणूक आयोगाच्या संदर्भात बोलले आहेत. कोणाला आघाडीत घ्यायचं नाही यावर दिल्लीत निर्णय होईल. संजय राऊत इंडिया आघाडीचे नेते आहेत त्यांच्या सोबत बोलायला मला काहीही अडचण नाही. दिवाळीच्या शुभेच्छा ही मी त्यांना देईन,असंही सपकाळ म्हणालेत.

Sanjay Raut: नेमकं प्रकरण काय?

संजय राऊत यांनी काँग्रेस वरिष्ठ नेत्यांना लिहिलेल्या पत्रात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधातील तक्रार नोंदवली आहे. मनसेला ‘महाविकास आघाडी’मध्ये समाविष्ट करण्यास सपकाळ यांचा तीव्र विरोध आहे, जो त्यांनी राऊत यांना देखील स्पष्ट केला होता. मात्र, हर्षवर्धन सपकाळ यांनी राऊत यांना पत्राद्वारे सांगितले होते की, “राज ठाकरे यांच्याबाबत चर्चा करून नंतर कळवतो,” असे असतानाही राऊत यांनी थेट दिल्लीतील काँग्रेस दरबारी पत्र पाठवून तक्रार केली. या कृतीमुळे काँग्रेस वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.

आणखी वाचा

Comments are closed.