उद्धव ठाकरे यांना काँग्रेसचा पाठिंबा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने निवडणूक लढवावी आणि महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे, अशा प्रकारची आमची भूमिका आणि आग्रह होता. मात्र, तत्कालीन परिस्थितीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार राज्यसभेवर गेले. महाविकास आघाडीतील पक्षांची एकंदर ताकद पाहता सर्वांनी एकत्र येऊनच या निवडणुका लढणे आवश्यक आहे. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होऊ घातलेली निवडणूक उद्धव ठाकरे यांनी लढवावी, अशी भूमिका हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडली.  वेगळा काही प्रस्ताव असेल तर निश्चितच चर्चेची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

फडणवीस यांनी सातव यांची जागा काँग्रेसला द्यावी

विधान परिषदेची निवडणूक होत असलेली दहावी जागा ही  काँग्रेसची आहे. काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली म्हणून त्यांची पत्नी प्रज्ञा सातव यांना परिषदेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपने त्यांना राजीनामा द्यायला लावला. बारामतीत ज्यावेळी काँग्रेसने अर्ज भरला त्यावेळी संस्कृतीची बरीच चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावेळी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती सांगत माघारीसाठी आग्रह धरला याची आठवण करून देत हर्षवर्धन सपकाळ यांनी सातव यांची जागा काँग्रेसला द्यावी, अशी मागणी केली.

Comments are closed.