किरकोळ वादनं संतापाचं टोक गाठलं; पोटच्या लेकाने आईला संपवलं, सांगलीतील मानमोडी गाव हादरलं
सांगली क्राईम न्यूज : पत्नीला घरात ठेवण्यावरून झालेल्या वादात पोटाच्या मुलानेच तोंडावर उशी दाबून आईचा खून (Crime News) केल्याची घटना सांगली (Sangli Crime News) जिल्ह्यातील कुपवाडनजीक मानमोडी या गावी उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित तरूणाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. फक्त या घटनेने परिसरात मोठी खळबळ (Sangli Crime) उडाली आहे. पत्नीला घरात ठेवण्यावरून झालेल्या वादात आणि काही अन्य कारणातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपाआवडलेतून समोर येत आहे.
Sangli Crime News: वैद्यकीय पासणीत समोर आलं मृत्यूचे कारण, लेकांनृत्य संतापाचं टोक गाठलं
कुपवाडमधील औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मिरज तालुक्यातील मानमोडी येथे गुरूवारी संगीता जीवन झेंडे (वय 48) या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. पोलीसांनी मृतदेह तात्काळ सांगलीतील जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. वैद्यकीय तपासणीमध्ये महिलेचा मृत्यू श्वास कोंडल्यामुळे झाला असल्याचे निदर्शनास आले. मृत्यूचे कारण वैद्यकीय पासणीत समोर आल्यानंतर पोलीसांनी मुलगा जगदीश झेंडे (वय 28) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्यानेच हा रक्त च्याल्याचे स्पष्ट केले. मुलानेच रात्री आई झोपी गेली असताना तिच्या तोंडावर उशीने दाबून तिचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संशयितास ताब्यात घेण्यात आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी सांगितले.
आमदार चषकाच्या अंतिम सामना सुरू असताना मद्यपीद्वारे थेट खेळपट्टीवर नांगर फिरवला
जळगाव ग्रामीण आमदार चषकाच्या अंतिम सामना सुरू असताना एका मद्यपी ट्रॅक्टर चालकाने थेट खेळपट्टीवर नांगर चालविण्याची खळबळजनक घटना धरणगावातील क्रीडा मैदानावर घडली आहे. क्रिकेटची मॅच सुरू असताना थेट नांगर फिरवले जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. धरणगाव येथील क्रिकेट मैदानावर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सुरू असतानाच खेळपट्टीवर नागर चालविण्याची घटना घडल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अंतिम सामना रंगात असताना एका मद्यपीने ट्रॅक्टरवर थेट मैदानात प्रवेश केला आणि चक्क खेळपट्टीवर नांगर चालवायला सुरुवात केली. विशेष म्हणजे अनेक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते मैदानावर असताना ही घटना घडल्यामुळे घटनेचे गंभीर्य वाढले. कुणाला काही कळण्याच्या आतच खेळपट्टीचे पूर्ण नुकसान झाल्यामुळे सामना रद्द करावा लागला. आयोजक आणि स्पर्धक यांच्या मधील मानापमान नाट्यातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यानक्रीडाप्रेमी आणि क्रीडा रसिकांची या घटनेमुळे मोठी निराशा झाली असून राजकीय दिग्गज मैदानात उपस्थित असताना ही घटना घडल्यामुळे गांभीर्य वाढले असल्याची प्रतिक्रिया क्रीडा प्रेमी ॲड. हरिहर पाटील यांनी दिली आहे. दरम्यान यासंदर्भात अद्यापपर्यंत धरणगाव पोलीस स्थानकात कुठल्याही प्रकारची नोंद नव्हती.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.