घरून अंडी चोरून आणून शाळेत विकायचा; कोंबडीचोर, मोटारचोर ते कॅप्टन, अशोक खरातचे लहानपणापासूनचे क
नाशिक: स्वतःला अंकशास्त्राचा ज्योतिषी म्हणवणारा अशोक खरात (Ashok Kharat) खरं तर गणित विषयांत २८ गुण मिळाल्याने नापास झाला होता. तर वावी गावातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत तो शिकत असताना त्याच्या उद्योगांमुळे त्याला कोंबडीचोर म्हणून ओळखलं जात होतं. त्यानंतर भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) मर्चंट नेव्हीत हमाली करायला गेला असता स्वतःला कॅप्टन म्हणवून घ्यायला सुरुवात केली. मात्र त्याच खरं रुप उघड झालं आणि सर्वांनाच त्याची किळस वाटायला लागली. तो ज्या शाळेत शिकला तिथं आत्ता शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी खरातच्या या उद्योगांमुळे आमची शाळा नाहक बदनाम झाल्याच म्हटलं आहे. तर त्याला या परिसरात कोंबडीचोर म्हणून ओळखलं जातं असताना देखील एवढे मोठ मोठे नेते त्याला कसे भुलत गेले याबद्दल ही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारावा अशी अपेक्षा या शाळेतील विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली आहे.(Ashok Kharat)
‘कोंबडी चोर’ अशी ओळख
स्वतःला अंकशास्त्राचा (Numerology) तज्ज्ञ आणि ज्योतिष म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात शालेय जीवनात अभ्यासात कच्चा होता. तो दहावीच्या परीक्षेत गणित विषयात केवळ २८ गुण मिळाल्याने नापास झाला होता. वावी परिसरातील नागरिक आणि त्याच्या सोबत शिकलेल्यांच्या मते, खरातला लहानपणी ‘कोंबडी चोर’ किंवा ‘मोटर चोर’ म्हणून ओळखले जायचे. घरून अंडी चोरून आणणे आणि शाळेत विकणे, असे त्याचे उद्योग होते. खरात मर्चंट नेव्हीमध्ये ‘हमाल’ किंवा खालच्या दर्जाचे काम करायला गेला होता. तिथून पाच-सात वर्षांनी परतल्यावर त्याने स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेण्यास सुरुवात केली आणि लोकांना फसवले. (Ashok Kharat)
मोठ्या नेत्यांच्या विश्वासावर आश्चर्य
परिसरात ‘कोंबडी चोर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीवर मोठे राजकीय नेते आणि अधिकारी कसे काय विश्वास ठेवू शकतात, याबद्दल विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सुशिक्षित समाजाने आणि नेत्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन सोडून अशा भोंदूगिरीवर विश्वास ठेवू नये, अशी अपेक्षा येथील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
व्हॉट्सॲप (WhatsApp) डाटा रिकव्हर करण्यासाठी प्रयत्न
भोंदू अशोक खरात प्रकरणी सर्व गुन्हे विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आले आहेत. यापुढील तपास एसआयटीच्या माध्यमातून होणार आहे. दरम्यान अशोक खरातच्या मोबाईल मधील काही संभाषण तसेच व्हॉट्सॲप (WhatsApp) डाटा रिकव्हर करण्यासाठी सायबर पोलिसांकडून ही प्रयत्न केले जात आहेत. तसंच नाशिक पोलिसांकडे दाखल झालेले ८ गुन्हे, तर वावी आणि सिन्नर पोलिसांकडील प्रत्येकी एक अशा १० गुन्हांचा एसआयटी तपास करणार आहे.
भोंदू अशोक खरात याच्याशी संबंधित आतापर्यंत दाखल सर्व 10 गुन्ह्याचा तपास एसआयटीच्या माध्यमातून केला जाणार आहे. अशोक खरात याच्यावर नाशिक पोलिसांत 8 गुन्हे दाखल झाले आहेत, तर वावी पोलिसात अशोक खरात याने दिनेश परब आणि राजेंद्र जासूद विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता, शिर्डी पोलिसांत अशोक खरातच्या ऑफिसबॉय विरोधात गुन्हा दाखल आहे हे सर्व गुन्हे एकमेकांशी संलग्न असल्यानं सर्व गुन्ह्याचा एकत्रित तपास एसआयटीच्या माध्यमातून केला जाईल. एसआयटीच्या टीमने काल रात्री नाशिक क्राईम ब्रँच कडून डीव्हीआर (dvr) सीसीटीव्ही (cctv) लॅपटॉप, कागदपत्रे यासह सर्व मुद्देलमाल ताब्यात घेतला आहे, या सर्व प्रकरणाचा एकत्रित तपास आता केला जाणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.