धूरफवारणी, पाण्याची तपासणी, रुग्णांवर उपचार सुरू, आरोग्य यंत्रणा वेहरेवाडी गावकऱ्यांच्या दारात गेली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुरबाड तालुक्यातील वेहरेवाडीमध्ये सरकारची आरोग्य यंत्रणा अखेर पोहचली आहे. या वाडीमध्ये तापाने फणफणलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून डॉक्टर, नर्सेस व कर्मचाऱ्यांचे पथक घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत. दरम्यान, वेहरेवाडीतील सार्वजनिक ठिकाणी धूरफवारणी करण्यात येत असून पाण्याचे नमुनेदेखील तपासले आहेत.

बेहरेवाडा साकारली

ऐन पावसाळ्यात मुरबाडची असल्याचे वृत्त आजच्या दैनिक ‘सामना’ मध्ये प्रसिद्ध होताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या वाडीमध्ये अडीचशे जणांना थंडी, ताप, डोकेदुखी आणि अतिसार अशा विविध आजारांनी ग्रासले आहे. मात्र त्यांना कोणतेही उपचार मिळत नव्हते. तसेच नाईलाजाने दूरवर जाऊन खासगी रुग्णाल यांत उपचार घ्यावे लागत होते.

दूषित पाण्यामुळे लागण

मुरबाडच्या वेहरेवाडीत तीन अतिसाराचे रुग्ण असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू केले आहेत. दूषित पाणी व माश्यांचा प्रादुर्भाव यामुळे साथींचे आजार वाढल्याचे अनुमान काढण्यात आले आहे. वाडीतील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात येत असून दोन बोअरिंगपैकी एक फुटलेली असल्याचे आढळून आले आहे. त्याचे दूषित पाणी प्यायल्यामुळे ग्रामस्थांना आजाराची लागण झाली असावी, असा अंदाज आरोग्य अधिकाऱ्यांनी

Comments are closed.