माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणी सलग दुसर्या दिवशी होणार सुनावणी; आमदार अपात्रतेला स्थगिती मिळणा
मणक्राव कोकेटे: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) व त्यांचा भाऊ विजय कोकाटे (Vijay Kokate) यांना झालेली दोन वर्षाची शिक्षा अमलात आणण्यावर सोमवारी अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. सुनावणी संपेपर्यंत माणिकराव कोकाटे यांना एक लाख रुपयांचा जामीन न्यायमूर्ती नितीन जीवने यांनी मंजूर केला आहे. आता शिक्षेच्या स्थगितीवर आज मंगळवारी (दि.25) सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी होणार आहे. तर आमदारकी अपात्र होऊ नये, यासाठी माणिकराव कोकाटे यांनी न्यायालयात अर्ज सादर केला आहे. अपात्रतेच्या मुद्यावर आज काय निर्णय होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील आठवड्यात माणिकराव कोकाटे यांना फसवणूक प्रकरणी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली होती. याविरोधात कोकाटे यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात अपील केले. कोकाटे यांचे वकील अॅड. अविनाश भिडे यांनी सांगितले की, अपील प्रकरण संपेपर्यंत शिक्षेला स्थगिती व जामीन मिळाला आहे. आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणी आज सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी होणार आहे.
आमदारकी अपात्र होऊ नये, यासाठी कोकाटेंनी सादर केला अर्ज
आजच्या सुनावणीला माणिकराव कोकाटे आज न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे. आमदारकी अपात्र होऊ नये, यासाठी माणिकराव कोकाटे यांनी अर्ज सादर केला आहे. या याचिकेवर आज जिल्हा सत्र न्यायालयात होणार सुनावणी आहे. सरकारी पक्ष आज आपली बाजू मांडणार आहे. अपात्रतेच्या मुद्यावर आज काय निर्णय होणार? या निर्णयाला स्थगिती मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर कोकाटे यांना जामीन मंजूर झालाय. जामिनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोकाटे न्यायालयात आज हजर राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
https://www.youtube.com/watch?v=zyjcxhu5l7o
नेमकं प्रकरण काय?
नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. गुरुवारी (दि. 20) या प्रकरणात नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.