हिमालयात अपेक्षेपेक्षा जास्त हिमवृष्टी.

नव्या अध्ययनाने बदलले पूर्ण चित्र

हिमालयात जितक्या हिमवृष्टीचा अनुमान आतापर्यंत लावला जात होता, प्रत्यक्षात त्याहून अधिक हिमवृष्टी होत असल्याचा दावा एका नव्या आंतरराष्ट्रीय अध्ययनात करण्यात आला आहे. वैज्ञानिकांनुसार जगभपरात वापर होणारा हवामान डाटा आणि मॉडेल हिमालयाच्या अनेक भागांमध्ये हिमवृष्टीचा योग्य अनुमान लावू शकलेले नाहीत, यामुळे हवामानाचा पूर्वानुमान, पाण्याचे आकलन आणि हिमवादळाच्या इशाऱ्यावर प्रभाव पडतो.

हे अध्ययन याच महिन्यात मंथली वेदर रिव्ह्यू जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. याचे नेतृत्व ब्रिटिश अंटार्क्टिक सर्वेचे वैज्ञानिक सिद्धार्थ गुम्बर यांनी केले. या संशोधनात यूके मेट ऑफिस, आयआयटी खडगपूर, युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स, युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज, युनिव्हर्सिटी ऑफ शेफील्ड आणि युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंघमचे वैज्ञानिकही सामील राहिले.

वैज्ञानिकांनी हिमालयात हिमवृष्टी समजून घेण्यासाठी एक नवे हाय-रिझोल्युशनर हवामान मॉडेल तयार केले, यात अशा नव्या हिमवृष्टीची आकडेवारीही जोडली आहे, जी पूर्वीच्या ग्लोबल हवामान डाटात सामील नव्हती. यानंतर अनेक ठिकाणी पूर्वीच्या अनुमानापेक्षा अधिक बर्फ पडत असल्याचे कळले.

हिमालयाचा भाग अत्यंत उंच आणि ओबडधोबड आहे, येथे काही किलोमीटर अंतरावरही हिमवृष्टीत फरक असू शकतो. परंतु जगभरात वापर होणारे हवामान मॉडेल इतक्या मोठ्या भागाचा एकत्रित अनुमान लावत असले तरीही ते अशा छघ्sट्या बदलांना योग्यप्रकारे टिपू शकत नाही, याचमुळे अनेक ठिकाणी हिमवृष्टीचा आकडा कमी दिसून येतो.

मनालीत 37 टक्के कमी निघाला अनुमान

अध्ययनात हिमाचल प्रदेशच्या मनाली भागाचे अध्ययन करण्यात आले. पूर्वी वापरण्यात येणाऱ्या हवामान डाटाने एका हिवाळ्याच्या ऋतूत एकूण हिमवृष्टीचा अनुमान 37 टक्क्यांपर्यंत कमी व्यक्त केला होता, नव्या मॉडेलमध्ये नवी आकडेवारी जोडल्यावर ही चूक निदर्शनास आल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले. नव्या अध्ययनानुसार काही भागांमध्ये पूर्ण हंगामादरम्यान प्रतिचौरस मीटर 800 किलोग्रॅमपेक्षा अधिक बर्फ जमा झाला आहे. हे पूर्वीच्या ग्लोबल हवामान डाटात नमूद अनुमानापेक्षा खूपच अधिक आहे.

योग्य आकडे कसे मिळाले?

वैज्ञानिकांनी हिमालयासोबत युरोपचा आल्प्स आणि अमेरिकेतील रॉकी पर्वतांमध्येही स्वत:च्या मॉडेलचे परीक्षण केले. यासाठी गोठलेल्या सरोवरांवर खास सेंसर बसविण्यात आले, हे सेंसर सरोवरावर जमा होणाऱ्या बर्फाचे वजन मोजतात, यातून किती बर्फ पडला आहे हे कळते. अशा पद्धतीमुळे दुर्गम पर्वतीय भागांमध्येही अत्यंत योग्य आकडे प्राप्त होऊ शकले आहेत.

अभ्यासाचे महत्त्व?

हिमालयातील बर्फ गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा यासारख्या मोठ्या नद्यांसाठी पाण्याचा मोठा स्रोत आहे. हाच बर्फ ग्लेशियरना देखील टिकविण्यास मदत करतो. याचबरोबर शेती, जलविद्युत प्रकल्प आणि कोट्यावधी लोकांच्या पिण्याच्या पाण्याची आवश्यकताही यावरच निर्भर असते. हिमवृष्टीचा अचूक अनुमान मिळाल्यास हवामानाचा पुर्वानुमान सुधारणार आहे. हिमवादळाचा इशारा अचूकपणे देता येऊ शकेल, तसेच हवामान बदलाचा हिमालयाचा बर्फ आणि तेथील पर्यावरणावर काय प्रभाव पडू शकतो हे समजून घेण्यास मदत होणार असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.

Comments are closed.