न्यायालयाचे आदेश गांभीर्याने न घेणाऱ्या वकिलांवर कठोर कारवाई करा; हायकोर्टाचे बार कौन्सिलला आदेश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

न्यायालयाचे आदेश गांभीर्याने न घेणाऱया वकिलांवर कठोर कारवाई करा, जेणेकरून आदेशाचे पालन न करण्याचे धाडस कोणी करणार नाही व याने न्यायालयाची प्रतिष्ठाही जपली जाईल, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला दिले आहेत.

न्यायालयाच्या आदेशाचे वकिलांकडून हेतुपुरस्सर उल्लंघन केले जाते. गेल्या काही वर्षांत हे प्रकार वाढत आहेत. एखाद्या आदेशाचे पालन न झाल्यास वकील काही ना काही सबब देतात. न्यायालयाने वेळोवेळी मोठेपणा दाखवून वकिलांची अशी कृत्ये माफ केली आहेत. मात्र यामुळे आदेशाचे पालन न करण्याचे धाडस वकिलांमध्ये वाढत चालले आहे, असे खडे बोल न्यायालयाने सुनावले. वकिलांच्या अशा वर्तनामुळे न्यायालयाच्या अधिकाराला कमी लेखले जात आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे. त्यासाठी आता बार काwन्सिलनेच अशा वकिलांवर कठोर कारवाईचा बडगा उगारायला हवा, असे न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाथा यांच्या खंडपीठाने आदेशात नमूद केले. न्यायालयाच्या प्रतिष्ठेची ही घसरण थांबवणे आवश्यक आहे. त्याकरिता बार कौन्सिलने कठोर भूमिका घ्यायलाच हवी, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

Comments are closed.