साताऱ्यात रंगणार हिंदकेसरीचा महासंग्राम!
तब्बल 22 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर साताऱयाच्या मातीत पुन्हा एकदा मानाच्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. 14 ते 17 मेदरम्यान छत्रपती शाहू स्टेडियमवर हा महासंग्राम होईल. देशातील बलाढय़ मल्लांच्या झुंजींसह थार गाडी, चांदीची गदा आणि लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात होणार आहे.
या स्पर्धेसाठी देशातील 28 राज्यांमधून तब्बल 600 पुरुष आणि 250 हून अधिक महिला कुस्तीपटू साताऱयात दाखल होणार आहेत. पुरुष हिंदकेसरी विजेत्यास थार गाडी आणि एक किलो चांदीची गदा देण्यात येणार असून, उपविजेत्यास ट्रॅक्टर, तिसऱया क्रमांकाला बुलेट, तर चौथ्या क्रमांकाच्या मल्लाला दुचाकी भेट दिली जाणार आहे. महिला हिंदकेसरी विजेत्या मल्लाला दुचाकी, उपविजेत्यास 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
Comments are closed.