IPL 2026 जो जिंकणार तो प्ले ऑफ गाठणार, गुजरात आणि हैदराबादमध्ये होणार घमासान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रविवारी मुंबई आणि लखनौसारखे हे दोन संघ आयपीएलच्या बाहेर पडले; पण अजूनपर्यंत एकही संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकलेला नाही. पण आता मंगळवारी आयपीएलला पहिला प्ले ऑफमध्ये पोहोचणारा संघ मिळू शकतो. कारण मंगळवारी सामना रंगणार आहे तो गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन तुल्यबळ संघांत. या सामन्यात जो संघ विजयी ठरेल, त्यांना प्ले ऑफमध्ये आपले स्थान भक्कम करण्याच्या दिशेने पाऊल टाकता येणार आहे.

गुजरातने गेल्या सामन्यात एकहाती विजय मिळवला होता. आतापर्यंत गुजरातने शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरातने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांना सात विजय मिळवता आले आहेत, तर चार पराभव त्यांना पत्करावे लागले आहेत. त्यामुळे गुजरातच्या संघाचे 14 गुण आहेत. दुसरीकडे हैदराबादच्या संघानेही 11 सामन्यांत सात विजयांसह 14 गुणांची कमाई केली आहे. पण गुजरातपेक्षा हैदराबादचा रन रेट जास्त आहे. त्यामुळे हैदराबादचा संघ हा दुसऱया आणि गुजरातचा संघ तिसऱया स्थानावर आहे. आतापर्यंत पॉइंट्स टेबलमध्ये कोणत्याही संघाला 16 गुण मिळवता आलेले नाहीत; पण हा सामना जो संघ जिंकेल, त्यांचे 16 गुण होतील आणि त्यांना प्ले ऑफच्या दिशेने ठोस पाऊल टाकता येणार आहे.

गुजरातच्या संघात उत्तम समन्वय

गुजरातची फलंदाजी कर्णधार गिल आणि साई सुदर्शन यांच्याभोवती फिरते. या दोघांनीही डावाच्या सुरुवातीला भक्कमपणा दिला आहे आणि पॉवरप्लेमध्ये हुशारीने खेळ केला आहे. जॉस बटलर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंमुळे संघाला अधिक मजबुती मिळत आहे. गुजरातचा गोलंदाजीचा माराही तितकाच प्रभावी आहे. मोहम्मद सिराज आणि कागिसो रबाडा यांच्या वेग आणि बळी घेण्याच्या क्षमतेला तोड नाही. रशीद खानच्या गोलंदाजीची त्यांना उत्तम साथ मिळते. त्यामुळे संघात फलंदाजी आणि गोलंदाजी उत्तम समन्वय पाहायला मिळतो.

हैदराबादचा विजय फलंदाजीवर अवलंबून

हैदराबादचा विजय फलंदाजीवरच अवलंबून असल्याचे सध्याचे चित्र आहे. संघात अभिषेक शर्मा, ट्रव्हिस हेड, ईशान किशन आणि हेनरिक क्लासेन या अव्वल फळीतील चौकडीने तुफानी फटकेबाजी केली आहे. या दोघांपैकी दोन फलंदाज जरी जास्त काळ टिकले तरी ते 200 धावांचा पल्ला गाठू शकतात. हैदराबादची गोलंदाजी पॅट कमिन्स आणि ऐहसान मलिंगा यांच्यावरच अवलंबून दिसते. त्यामुळे गोलंदाजी हा हैदराबादचा कच्चा दुवा असल्याचे समोर आले आहे.

Comments are closed.