शनिवार वाडा ‘नमाज पठण’ प्रकरणात हिंदू महासभेची उडी; पोलिसांकडे पत्राद्वारे केली मागणी, म्हणाले,


पुणे: पुण्यातील शनिवार वाड्यातील काही दिवसांपूर्वी नमाज पठणाचा (Shaniwarwada Namaz Pathan) व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक झाल्या. शनिवार वाडा ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. १७३० मध्ये बाजीराव पेशव्यांच्या काळात ही वास्तू बांधली गेली. या वाड्याला इतिहासात अनन्य साधारण महत्त्व आहे. शनिवार वाड्यात नमाज पठणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पतित पावन संघटनेने या ठिकाणी जाऊन आंदोलन केलं. मेधा कुलकर्णी यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. शनिवार वाड्यात ज्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं तिथे गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र करण्यात आली. पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडून ही जागा पवित्र केली. त्यानंतर आता ऐतिहासिक शनिवार वाड्यात फक्त हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावं, आधार कार्ड चेक करूनच लोकांना आतमध्ये सोडावं अशी मागणी हिंदू महासभेकडून करण्यात आली आहे.(Shaniwarwada Namaz Pathan)

Shaniwarwada Namaz Pathan: आदेश देण्याऐवजी टाइम पास करण्यासाठी 8 दिवसांची वेळ दिली

गेले काही दिवसांपासून ऐतिहासिक शनिवार वाडा या ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं होतं यासंदर्भात वाद सुरू आहे आणि त्या वादात आता हिंदू महासभेने देखील उडी घेतली आहे. बरोबर तीन वर्षांपूर्वी या दर्ग्याचा विषय आम्हीच घेतला होता. आज दुपारी 12 वाजता शनिवार वाडा हिंदूंसाठीच असावा असं पत्र देणार (Shaniwarwada Namaz Pathan) आहोत. सरकारमधील लोकांनी पोलिसांना आदेश देण्याऐवजी टाइम पास करण्यासाठी 8 दिवसांची वेळ दिली असं म्हणत खासदार मेदा कुलकर्णींवर निशाणा साधला आहे. पण झाले काहीच नाही. काय केलं 8 दिवसात पोलिसांनी हे आम्ही आज पोलिसांना विचारू. शनिवार वाड्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश द्यावा असं पत्र आम्ही देणार आहोत आणि हिंदूंच्या भावना जाग्या आहेत, हे दाखवण्यासाठी सामुदायिक वंदे मातरम सुद्धा म्हणणार आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Shaniwarwada Namaz Pathan)

Shaniwarwada Namaz Pathan: हिंदू महासभेने पोलिसांना दिलेल्या पत्रात काय?

आम्ही हिंदू महासभा नम्र निवेदन करतो की, पुण्यनगरीत सातत्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावतील अशी कृत्य करण्यात येत आहेत, हे आम्ही वेळोवेळी पोलीस प्रशासनाच्या निर्दशनास आणून दिले आहे, मात्र त्यामध्ये सारसबाग, लालमहाल किवा शनिवार वाडा सारख्या शहराची अस्मिता असलेल्या तसेच हिंदू धर्मीयांचा भावना भावना असलेल्या ऐतिहासिक वास्तूंबाबत च्या घटना असतील, अशा घटना घडण्यामागे काय कारणे आहेत याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. यामुळे शहरातील धार्मिक वातावरण बिघडत आहे. अशा प्रकारचे कृत्य जाणीव पुर्वक करण्यात येते जाणीवपूर्वक करण्यात येत आहे आम्हाला वाटते आहे.

नुकतेच मागील आठवड्यात काय   हिंदवी स्वराज्यातील शौर्याचे प्रतिक असलेला, जिथून परकीय आक्रमण  थांबवण्यासाठीचा लढा लढला गेला, उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत हिंदवी स्वराज्याचा विस्तार ज्या  ठिकाणावरून झाला त्या शनिवार वाडा येथे ठरवून नमाज पठण करण्यात आले आणि त्यामुळेच हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत तसेच इतिहासात कुठलेही पुरावे नसलेल्या दर्ग्याला रीतसर  प्रशासन आश्रय देत आहे. आम्ही १४ नोव्हें २०२१ ते ३० नोव्हें २०२२ काळात शनिवार वाडा येथील येथील दर्ग्याचा हळूहळू विस्तार केला जात आहे तसेच सदर दर्गा  अनधिकृत बांधला गेला आहे ही बाब पुरातत्त्व खाते व  पोलीस प्रशासनापुढे आणली आहे.

सदर दर्जा हटवला जावा अशी मागणी आम्ही मागील अनेक वर्षापासून करीत आहोत. २०२२ साली पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने दर्गा चालवणाऱ्या   व्यक्तीने सगळे काढण्याचे कबूल केले होते परंतू तसे घडले नाही…. त्यांचे कडून स्वतःहून असे केले जाणार नाही.नुकत्याच घडलेल्या नमाज पठणाच्या घटनेस ८-१० दिवस उलटून गेले असून याबाबत सविस्तर माहिती अजूनही आली नाही पोलीस प्रशासनाने केलेल्या तपासानुसार सदर कृत्य कोणी कशासाठी, ठरवून केले गेले का? याबाबत खुलासा करण्यात यावा. सर्व हिंदू संघटनांनी केलेल्या मागणीनुसार  ८ दिवसात दर्गा हटवला जावा या मागणीबाबत देखील पावले उचलली गेली नाहीत, प्रशासन याकरिता काय करणार आहे? आपणांस नम्र निवेदन शनिवार वाडा येथील अनधिकृत दर्गा काढण्यात न्यावा. तसेच शनिवार वाड‌यात हिंदू धर्मियांव्यतिरिक्त इतरांना प्रवेश बंदी करण्यात यावी, प्रवेशासाठी आधार कार्ड तपासूनच सोडण्यात यावे, ही विनंती.

आणखी वाचा

Comments are closed.