हिंगोली दहशतीखाली! शहरातील अवैध धंद्यांना आमदार संजय बांगरांचा आश्रय, नागेश पाटलांचा हल्लाबोल


हिंगोली बातम्या : हिंगोली शहर दहशतीखाली चाललं आहे. मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहेत, त्याला शिंदे गटाचे आमदार संजय बांगर आश्रय देत असल्याची टीका ठाकरे गटाचे नेते  नागेश पाटील आष्टीकर यांनी केली. त्यांच्याच युतीतील आमदार तान्हाजी मुटकुळे याबाबत मुख्यमंत्र्याकडे तक्रार करत आहेत असे नागेश पाटील आष्टीकर म्हणाले.

आमदार संतोष बांगर यांचं शिवसेना पक्षात पालन पोषण मी केलं

आमदार संतोष बांगर यांचं शिवसेना पक्षात पालन पोषण मी केलं होतं हे वास्तव आहे असे नागेश पाटील आष्टीकर म्हणाले. कोण कोणत्या पक्षात चालला आहे या चर्चेत भाग घ्यायची यांना सवय असेल. मागील 15 दिवसापासून मी मुंबईला सुध्दा गेलो नाही. मतदार संघात 8 नगरपालिका निवडणुका आहे. मी सातत्याने सगळीकडे फिरत आहे, संजय बांगर यांच्या बोलण्यात काही तथ्य वाटत नाही असे  नागेश पाटील आष्टीकर म्हणाले.

आम्ही उद्धव ठाकरेंसोबत खुश आहोत

मी उद्धव ठाकरे साहेबांसोबत खुश असल्याचे मत नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केले. खूप दिवसापूर्वीचा फंडा नव्याने सुरू केल्यासारखा आहे, यात अजून काही नाही.  त्यांच्याच पक्षामध्ये एवढी भाऊ गर्दी झाली आहे की त्यांनाच अंगावर घेणं कठीण झालं आहे. त्यांच्याकडेच खूप गर्दी झाली आहे की आम्हाला कशाला या म्हणतील. आपण कमजोर पडल्यानंतर ही भाषा वापरत आहेत असे  नागेश पाटील आष्टीकर म्हणाले. आमच्या पक्षाच्या रॅलीमध्ये मी वास्तव टीका केली होती.

आणखी वाचा

Comments are closed.