Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?

गृहकर्ज नवी दिल्ली: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी  Home Loan Bank Rates मुंबई : तुम्ही जर घर खरेदी करण्याचं नियोजन करत असाल बँकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून किती व्याज दरानं गृह कर्ज दिलं जातं हे माहिती असणं आवश्यक आहे. स्वत:च्या मालकीचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. घर खरेदी करताना बहुतांश जणांना बँकांकडून गृहकर्ज घ्यावं लागतं. यामुळं तुम्ही जर गृह कर्ज घेणार असाल तर तुम्हाला कोणत्या बँका गृहकर्ज किती टक्के व्याज दरावर उपलब्ध करुन देतात हे माहिती असायला पाहिजे.

गृह कर्जाचा कालावाधी मोठा असल्यानं कमी व्याज दरावर मिळणार कर्ज फायदेशीर ठरु शकतं. तर, अधिक व्याजानं घेतलेल्या कर्जाची परतफेड करताना अधिक रक्कम दीर्घ काळात परत करावी लागू शकते.गृहकर्ज वितरण करण्यात बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या आघाडीवर आहेत

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या रेपो रेटचा परिणाम गृह कर्जाच्या व्याज दरावर होते. आरबीआयनं फेब्रुवारी महिन्यात पतधोरण जाहीर करताना रेपो रेट 5.25 टक्के कायम ठेवला आहे. यामुळं बँकांनी गृहकर्जाच्या व्याज दरात फार बदल केलेले नाहीत.

सार्वजनिक बँकांचे व्याज दर

यूको बँक : 7.15 टक्के ते 9.25 टक्के
कॅनरा बँक : 7.15 टक्के ते 10.00 टक्के
बँक ऑफ बडोदा : 7.20 टक्के ते 9.25 टक्के
स्टेट बँक ऑफ इंडिया : 7.25 टक्के ते 8.70 टक्के
यूनियन बँक ऑफ इंडिया :7.15 टक्के ते 9.50 टक्के
पंजाब नॅशनल बँक :7.20 टक्के ते 9.10 टक्के
बँक ऑफ इंडिया : 7.10 टक्के ते 10.25 टक्के

खासगी बँकांचे व्याज दर :

कोटक महिंद्रा बँक : 7.70 टक्क्यांपासून सुरु
आयसीआयसीआय बँक : 7.45 टक्क्यांपासून सुरु
एक्सिस बँक : 8.00 ते 11.90 टक्के
एचएसबीसी बँक :7.75 टक्क्यांपासून सुरु
साऊथ इंडियन बँक :7.20 टक्क्यांपासून सुरु
करुर वैश्य बँक : 8.50 ते 10.65 टक्के
कर्नाटक बँक : 7.30 ते 11.68 टक्के

हाऊसिंग फायनान्स कंपन्या

एलआयसी हाऊसिंग फायनान्स : 7.15 टक्क्यांपासून सुरु
बजाज हाऊसिंग फायनान्स :7.15 टक्क्यांपासून सुरु
टाटा कॅपिटल : 7.50 टक्क्यांपासून सुरु
पीएनबी हाऊसिंग फायनान्स : 7.50 टक्क्यांपासून सुरु
जीआयसी हाऊसिंग फायनान्स : 8.20 टक्क्यांपासून सुरु
आयसीआयसीआय होम फायनान्स : 7.50 टक्क्यांपासून सुरु
गोदरेज हाऊसिंग फायनान्स : 7.60 टक्क्यांपासून सुरु

कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणाला मिळतं?

सर्वसाधारणपणे ज्या व्यक्तींचा क्रेडिट स्कोअर 800 पेक्षा अधिक असतो त्यांना कमी व्याज दरावर गृह कर्ज मिळतं.  तुम्ही नोकरदार असाल किंवा स्वत:चा व्यवसाय असेल तर व्याजाचे दर बदलतात.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पुढील पतधोरण विषयक बैठक 7 ते 9 एप्रिल दरम्यान होणार आहे. 9 एप्रिलला रेपो रेट जाहीर केला जाणार आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.