25 वर्षांचं गृहकर्ज 10 वर्षात कसं फेडायचं, 2 पर्याय ठरतील फायदेशीर, 35-40 लाखांचं व्याज वाचणार
मुंबई : आपलं स्वत:च्या मालकीचं घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. घर खरेदीसाठी अनेक जण बँका किंवा वित्तीय संस्थांकडून गृह कर्ज घेत असतात.गृह कर्ज घेतल्यानंतर सुरुवातीच्या काळात ईएमआय भरत असताना व्याज मोठ्या प्रमाणात भरावं लागतं, तर, मुद्दल रक्कम कमी प्रमाणात कर्ज खात्यात जमा होते. सुरुवातीच्या कालावधीत अनेक जणांना गृहकर्जाचं मुद्दल का कमी होत नाही असा प्रश्न पडू शकतो. सुरुवातीच्या काळात ईएमआयमधील जवळपास 90 टक्के रक्कम व्याजात जाते तर 10 टक्के रक्कम मुद्दल म्हणून जमा होते आणि कर्जाची रक्कम कमी होते. जर 25 वर्षांचं गृहकर्ज घेतलं असेल तर ते 10 वर्षात कसं फेडावं यासंदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत.
समजा एखाद्या व्यक्तीनं 50 लाखांचं गृहकर्ज 25 वर्षांच्या कालावधीसाठी 8.5 टक्के व्याजानं घेतलं तर त्याला मासिक हप्ता 40000 रुपये भरावं लागेल. म्हणजेच पहिल्या वर्षात संबंधित व्यक्ती 480000 रुपये गृहकर्जासाठी ईएमआयद्वारे भरेल, त्यापैकी 60000 हजार रुपये मुद्दल म्हणून कर्जाच्या रकमेतून कमी होईल, तर 4.2 लाख रुपये व्याज बँकेला मिळेल.
10 वर्षात गृह कर्जाची परतफेड कशी करायची?
मान्यताप्राप्त वित्तीय सल्लागार विजय महेश्वरी यांनी 25 लाख रुपयांचं गृहकर्ज 10 वर्षांमध्ये कसं फेडायचं आणि लाखो रुपयांचं व्याज कसं वाचवायचं याबाबत माहिती दिली. जर, तुमचा ईएमआय 40000 रुपये असेल तर प्रत्येक वर्षात एक अतिरिक्त ईएमआय भरा, यामुळं मुद्दल रक्कम कमी होईल. या नुसार गृहकर्जाचा कालावधी 25 वर्षांवरुन 20 वर्षांवर येईल.
ईएमआयची रक्कम वाढवा
समजा संबंधित व्यक्तीचा गृहकर्जाचा ईएमआय 40 हजार रुपयांवरुन 7.5 टक्के वाढवून 43000 रुपये केल्यास, त्याच्या पुढील वर्षी 46200 ईएमआय वाढवल्यास, म्हणजेच दरवर्षी 7.5 टक्के ईएमआय वाढवल्यास गृह कर्ज 12 वर्षा त संपू शकते.
दोन्ही पर्यायांचा वापर केल्यास म्हणजेच दरवर्षी एक अतिरिक्त ईएमआय भरला आणि ईएमआयमध्ये 7.5 टक्क्यांची वाढ केल्यास 25 वर्षांचं गृहकर्ज 10 वर्षात संपू शकते. या पर्यायाद्वारे 35 ते 40 लाख रुपयांची बचत होऊ शकते.
समजा एखाद्या व्यक्तीनं 50 लाखांचं गृहकर्ज घेतलं असेल आणि त्याचा व्याजदर 8.5 टक्के आणि ईएमआय 40000 असेल तर कोणताही ईएमआय न वाढवल्यास 2049 पर्यंत 1.2 कोटी रुपये भरावे लागतील. म्हणजेच 70 लाख रुपये व्याज जाऊ शकतं. गृहकर्ज परतफेडीचे दोन्ही पर्याय वापरल्यास परतफेडीचा कालावधी 25 वर्षांऐवजी 10 वर्ष होईल. या कर्जाची परतफेड मुद्दल 50 लाख रुपये आणि व्याज 35 लाख अशी 85 लाख रुपये परतफेड होईल तर 35 ते 40 लाखांची बचत होऊ शकते.
जर तुम्ही देखील गृहकर्ज घेत असाल तर 20-25 वर्षांपर्यंत ईएमआय भरु नका, पगार जसा वाढेल त्या प्रमाणं एक अतिरिक्त ईएमआय भरा. दोन्ही पर्यायांचा वापर करुन 10 वर्षात कर्ज मुक्त होऊ शकता.
आणखी वाचा
Comments are closed.