होर्मुझची सामुद्रधुनी लवकरच अमेरिकन प्रांत घोषित करणार; ट्रम्प यांच्या घोषणेने जगभरात खळबळ, इराणने दिले सडेतोड प्रत्युत्तर

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुजच्या सामुद्रधुनीला अमेरिका लवकरच स्वतःचे क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. न्यू यॉर्क स्टेटमधील एका पोलीस अकादमीत आयोजित रॅलीदरम्यान त्यांनी ही घोषणा केली. यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली असून आखातात याचे तीव्र पडसात उमटण्याची शक्यता आहे.

इराणचा पूर्ण पराभव केल्यानंतर मी लवकरच होर्मुजची सामुद्रधुनी अमेरिकन क्षेत्र म्हणून घोषित करेन, असे डोनाल्ड ट्रम्प उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. मात्र, हे पाऊल नेमके कधी आणि कसे उचलले जाईल, याविषयी त्यांनी कोणताही स्पष्ट आराखडा मांडला नाही.

दरम्यान, ट्रम्प यांच्या या विधानानंतर इराणने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणचे उपपरराष्ट्रमंत्री काझिम गरीबाबादी यांनी ट्रम्प यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. होर्मुजच्या सामुद्रधुनीवर कोणत्याही ट्विट, विमानावाहू जहाजे, कार्यकारी आदेश किंवा निवडणुकीतील भाषणांनी ताबा मिळवता येत नाही. इराण अशा धमक्यांना किंवा लष्करी ताकदीच्या प्रदर्शनाला अजिबात घाबरत नाही, असा इशारा गरीबाबादी यांनी दिला.

होर्मुजची सामुद्रधुनी ही इराणची होती, आहे आणि यापुढेही इराणचीच राहील. हा मार्ग कधी बंद करायचा आणि कधी उघडायचा याचा पूर्ण अधिकार फक्त इराणकडेच असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच जोपर्यंत अमेरिका आपला पराभव स्वीकारत नाही आणि भ्रमातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत इराण होर्मुजच्या सामुद्रधुनीची ही कोंडी अशीच सुरू ठेवेल, असेही गरीबाबादी यांनी म्हटले.

इराण युद्धात अमेरिकेचे ४५ ‘रीपर’ ड्रोन नष्ट; ड्रोनच्या ताफ्यात २५ टक्के घट, तब्बल १.३ अब्ज डॉलर्सचे नुकसान

Comments are closed.