रुग्णालयांच्या औषध बळजबरीला चाप
रुग्णालयांची मोनोपॉली मोडीत काढण्यासाठीही कडक पावले उचलली जाणार आहेत. अनेक रुग्णालये आपल्याच रुग्णालयातील मेडिकलमधून औषध घेण्याची सक्ती रुग्णांवर करतात. त्यासंदर्भात रुग्णांनी तक्रार केल्यास तातडीने त्या रुग्णालयाविरुद्ध कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
बऱयाच ठिकाणी आमच्याकडे अशा तक्रारी येतात की, रुग्णालयात एखादा पेशंट ऍडमिट असेल तर त्याला लागणारी औषधे त्याच रुग्णालयाच्या फार्मसीमधून घेण्याची सक्ती केली जाते. औषधे कुठून खरेदी करायची हा पेशंटचा मूलभूत अधिकार आहे, कायद्यानुसार कोणतीही संस्था किंवा रुग्णालय रुग्णांना औषधे ठराविक ठिकाणाहून घेण्याची सक्ती करू शकत नाही. असे मुंढे यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.