आमच्या विरोधात उभे राहण्याची हिंमत कशी काय केली? पिंपरीत विरोधक उमेदवाराच्या घरात भाजपच्या कार्
पिंपरी चिंचवड: राज्यात महानगरपालिका निवडणुका अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे, आरोप प्रत्यारोपांने राजकीय वातावरण तापलं आहे, अशातच पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Pimpri-Chinchwad Municipal corporation) विरोधक उमेदवाराच्या घरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे, शिवीगाळ करत विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसा गुन्हा ही नोंदवण्यात आला असल्याची माहिती आहे. 33 वर्षीय डॉ. महिलेने तशी फिर्याद दिली आहे. प्रभाग क्रमांक 21 मधील विरोधी उमेदवाराच्या घरात भाजप कार्यकर्ते शिरले, असा आरोप केला जात आहे, तसे व्हिडीओ समोर आणून हे भाजपचे कार्यकर्ते आहेत, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे.(Pimpri Pimpri-Chinchwad Municipal corporation)
आमच्या विरोधात उभे राहण्याची हिंमत कशी काय केली, अशी धमकी दिल्याचंही फिर्यादीत म्हटलं आहे.आरोपी हे विरोधी पॅनल भाजप उमेदवार उषा संजोग वाघेरे यांचे समर्थक आणि कार्यकर्ते असल्याचा त्यांचा आरोप आहे. ही घटना काल रात्री 12: 15 च्या सुमारास नवमहाराष्ट्र स्कुल पिंपरी गावातील घराजवळ घडली. स्वप्नील वाघेरे, सूरज वाघेरे, सागर वाघेरे, सिद्धार्थ वाघेरे, वरून जगताप, प्रशांत वाघेरे, सारंग वाघेरे, इतर काही जणांनी घरासमोर येऊन स्वप्नील वाघेरे याने आमच्या परवानगी शिवाय घरात प्रवेश केला. माझे चुलत सासरे यांना अश्लील शिवीगाळ केली. तुम्ही आमच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचं धाडस केले तुम्हाला जीवे मारून टाकू अशी धमकी देण्यात आली असे फिर्यादीत म्हटले आहे.(Pimpri Pimpri-Chinchwad Municipal corporation)
नेमकं काय घडलं?
पिंपरी चिंचवडमध्ये विरोधक उमेदवाराच्या घरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे, शिवीगाळ करत विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसा गुन्हा ही नोंदवण्यात आला असल्याची माहिती आहे. 33 वर्षीय डॉ. महिलेने तशी फिर्याद दिली आहे. प्रभाग क्रमांक 21 मधील विरोधी उमेदवार यांच्या घरात भाजप कार्यकर्ते शिरले, असा आरोप केला जात आहे, तसे व्हिडीओ समोर आणून हे भाजपचे कार्यकर्ते आहेत, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे.आमच्या विरोधात उभे राहण्याची हिंमत कशी काय केली, अशी धमकी दिल्याचंही फिर्यादीत म्हटलं आहे.आरोपी हे विरोधी पॅनल भाजप उमेदवार उषा संजोग वाघेरे यांचे समर्थक आणि कार्यकर्ते असल्याचा त्यांचा आरोप आहे.
तक्रारदार डॉ.महिलेला देखील शिव्या देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अश्लील वर्तन करत आरोपींनी विनयभंग केला. त्याचबरोबर दिराला धक्काबुक्की केली. आजेसासू यांना ढकलून दिले, दुचाकी वाहनांचं नुकसान केलं. दहशत निर्माण केली. असे अनेक आरोप फिर्यादीत करण्यात आले आहेत. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा व्हिडीओही फिर्यादीकडून पोलिसांकडे सादर करण्यात आला असून, त्याच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. संबंधित प्रकरणाचा सखोल तपास केला जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
आणखी वाचा
Comments are closed.