घरी किती सोनं ठेवता येतं? मर्यादेपेक्षा अधिक साठा आढळल्यास होते कारवाई, जाणून घ्या नियम
मुंबई : सोन्यातील गुंतवणूक हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो. 2025 मध्ये सोन्यातील गुंतवणूकदारांना जोरदार परतावा मिळालेला आहे. 31 डिसेंबर 2024 ला 24 कॅरेट सोन्याचे एका तोळ्याचे दर 75000 रुपयांच्या दरम्यान होते. जे दसऱ्यापर्यंत 1 लाख 21 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. भारतात सोन्याच्या दागिन्यांचं सांस्कृतिक महत्त्व आहे. विविध सणांच्या दिवशी सोने खरेदी करण्याची परंपरा भारतात आहे. लग्न आणि इतर समारंभामध्ये सोने मोठ्या प्रमाणात खरेदी केलं जातं. भारतीय नागरिक सोन्याच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात करतात. घरी किती सोन्याचा साठा करायचा यासंदर्भात आयकर विभागाचे काही नियम आहेत. ते अनेकांना माहिती नसतात. जर एखाद्या नागरिकांनी त्या मर्यादेपेक्षा अधिक सोन्याचा साठा केला तर त्याची आयकर विभागाकडून चौकशी होऊ शकते तर काही वेळा आयकर विभाग छापा देखील टाकू शकतो. कायद्यानुसार घरी सोनं किती ठेवायचं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
Gold Storage Limit at Home : घरी किती सोनं साठवता येत?
भारतात सोने खरेदी आणि सोनं घरी ठेवण्याचे नियम वेगवेगळे आहेत. पुरुष, विवाहित महिला आणि अविवाहित महिलांसाठी वेगवेगळे नियम आहेत.विवाहित महिलांना त्यांच्याजवळ 500 ग्रॅम सोनं ठेवण्याची परवानगी आहे. अविवाहित महिलांना 250 ग्रॅम तर पुरुषांना 100 ग्रॅम सोनं घरी ठेवण्याची परवानगी आहे.
जर तुमच्याकडे या मर्यादेपक्षा अधिक सोनं असेल तर त्याचा उल्लेख इन्कम टॅक्स रिटर्न डिक्लेरेशनमध्ये असलं पाहिजे. जर, तुमच्याकडे योग्य पुरावे असतील तर तुम्ही कितीही प्रमाणात सोनं साठवू शकतात. आयकर विभागाची मर्यादा कागदपत्राशिवायच्या सोन्यावर लागू असते. म्हणजेच सोनं कितीही असलं तरी त्याचे पुरावे असणं आवश्यक आहे.
तुम्ही तुमच्या घोषित उत्पन्नातून सोने खरेदी करत असाल किंवा सोने खरेदी कर मुक्त उत्पन्न म्हणजेच शेती उत्पन्नातून केली असेल, किंवा सोने कायदेशीरपणे वारस म्हून मिळालेलं असेल तर कर लागणार नाही. जर, तुम्ही निश्चित मर्यादेत सोने साठवता किंवा त्यापेक्षा अधिक सोनं तुमच्याकडे असेल त्याचे वैध पुरावे तुमच्याकडे असले पाहिजेत. या स्थितीत जर छापेमारी झाली तर सोने जप्त केलं जात नाही. घरी साठवलेल्या सोन्यावर कोणताही कर लागत नाही. मात्र, सोन्याची विक्री करत असाल तर त्यावेळी कर द्यावा लागतो.
सोन्याचा आजचा दर किती?
आयबीजेएच्या अपडेटनुसार 24 कॅरेट सोन्याचे जीएसटीशिवायचे एका तोळ्याचे दर 116833 रुपये आहेत. आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर, चांदीचे जीएसटी शिवायचे एका किलोचे दर 145010 रुपये आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.