ओडिशाच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात वायूचे प्रचंड साठे आहेत
देशाचे गॅससंकट होणार दूर : 1450 मीटर खोल समुद्रात आहे खजिना
सरकारी कंपनी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनने (ओएनजीसी) भारताच्या पूर्व किनाऱ्यानजीक खोल समुद्रात वायूसाठ्याचा शोध लावला आहे. ओडिशाच्या कोणार्कपासून सुमारे 43 किलोमीटर अंतरावर महानदी ऑफशोर बेसिनमध्ये हा साठा आहे. कंपनीनुसार सुमारे 1450 मीटर खोलवर हा साठा मिळाला आहे.
वृत्तसंस्था, भुवनेश्वर
हा शोध एमएन-डीडब्ल्यू18-1-एच-डी विहिरीत लागला आहे. ओएनजीसीच्या ‘समुद्र मंथन“ डीपवॉटर एक्सप्लोरेशन अभियानाच्या अंतर्गत येथे ड्रिल करण्यात आले होते. एक्सप्लोरेशन वेलमध्ये (विहिरीत) 1441 मीटर ते 1452 मीटरच्या खोलीदरम्यान वायू मिळाला आहे. या विहिरीला 1623 मीटरच्या लक्ष्यित खोलीपर्यंत ड्रिल करण्यात आले होते. महानदी खोऱ्यात समुद्र मंथन अभियानाच्या अंतर्गत ओएनजीसीकडून ड्रिल करण्यात आलेली ही पहिली वेल आहे. कंपनीने 25 जुलै रोजी ‘प्लॅटिनम एक्सप्लोरर“ ड्रिलशिपच्यामदतीने या विहिरीचे ड्रिलिंग सुरू केले होते.
तीन दिवसांपासून वायूचा प्रवाह
या विहिरीतून मागील तीन दिवसांपासून गॅसचा फ्लो होत आहे. येथे उत्साहजनक फ्लो आणि रिजर्वायर प्रेशर नोंद झाला असल्याचे कंपनीने सांगितले आहे. परंतु अद्याप याची व्यावसायिक स्वरुपात उपयुक्त वायूसाठ्याच्या स्वरुपात पुष्टी देण्यात आलेली नाही.
आणखी पडताळणी होणार
गॅसच्या शोधानंतर आता ओएनजीसी पुढील तपासणी आणि व्यावसायिक मूल्यांकन करणार आहे. याचा उद्देश वायूसाठ्याचा आकार आणि याच्या व्यावसायिक व्यवहार्यतेचा शोध लावणे आहे. कंपनी रिजर्वायर आणि तेथून काढता येऊ शकणाऱ्या साधनसंपदेचे आकलन करणार आहे. त्यानंतरच या शोधाला विकसित करण्यावरून कुठलाही निर्णय घेण्यात येणार आहे.
किनाऱ्याच्या नजीक लागला शोध
हा शोध ओsडिशाच्या किनाऱ्यापासून सुमारे 43 किलोमीटर अंतरावर लागलाअ ाहे. याच्या पुढील पडताळणीत वायू साठा व्यावसायिक स्वरुपात उपयुक्त मानण्यात आल्यास किनाऱ्याशी असलेली नजीकता विकास आणि गॅसला बाजारांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेत मदत करू शकते. या शोधासोबत क्षेत्रात झालेल्या अन्य शोधांना संयुक्त सुविधांद्वारे विकसित करण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे प्रत्येक शोधासाठी वेगवेगळ्या मूलभूत सुविधा तयार करण्याची आवश्यकता कमी होऊ शकते. क्षेत्राच्या डीपवॉटर साधनसामग्रीला संयुक्त मूलबूत सुविधांद्वारे उत्पादनात आणण्यात पेट्रोरियम आणि नैसर्गिक वायू नियम, 2025 च्या अंतर्गत मदत मिळू शकते.
खोल पाण्याच्या शोधाचा जोर
महानदी खोऱ्यात हा शोध ओएनजीसीच्या भारताच्या सागरी भागांमध्ये डीपवॉटर एक्सप्लोरेशन वाढविण्याच्या प्रयत्नांचा हिस्सा आहे. परंतु कुठल्याही शोधानंतर त्याला व्यावसायिक उत्पादनापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढील पडताळणी, मूलभूत सुविधा आणि गुंतवणुकीची आवश्यकता असते. आता ओएनजीसीचा भर या वायूसाठ्याचा विस्ताराचा शोध घेणे, त्यातून काढता येऊ शकणाऱ्या संपदेचा अनुमान लावणे आणि या शोधाला व्यावसायिक स्वरुपात विकसित केले जाऊ शकते की नाही हे निश्चित करण्यावर असेल. पुढील पडताळणीच्या निष्कर्षांच्या आधारावरच या प्रकल्पाचा पुढील टप्पा निश्चित होईल.
Comments are closed.