हैदराबाद तरुणाची अमेरिकेत आत्महत्या
न्यूयॉर्क: हैदराबादचा रहिवासी साई प्रदीपने अमेरिकेत जात मास्टर्स डिग्री मिळविली होती. परंतु नोकरी न मिळाल्याच्या निराशेतून साई प्रदीपने आत्महत्या केली आहे. साउथ कॅरोलिनामधील एंडरसन युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ बिझनेसमधून त्याने मास्टर डिग्री मिळविली होती आणि अमेरिकेत नोकरी मिळविण्यासाठी तो जोरदार प्रयत्न करत होता. परंतु अनेक महिने उलटून देखील नोकरी न मिळाल्याने तो आर्थिक दबावात होता. अशास्थितीत साई प्रदीपने टेक्सासच्या सॅन एंटोनियो येथे आत्महत्या केली आहे.
Comments are closed.