मी बलात्कारी नाही; ट्रम्प पत्रकारावर संतापले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘मी बलात्कारी नाही. मी कोणावरही बलात्कार केलेला नाही…’, असे म्हणत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज एका पत्रकाराला चांगलेच फैलावर घेतले. व्हाइट हाउसच्या डिनर पार्टीत गोळीबार करणाऱया कोल अॅलन याने या हल्ल्याआधी लिहिलेली एक कथित चिठ्ठी समोर आली आहे. त्यात त्याने ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

‘सीबीएस 60 मिनिट्स’चा प्रतिनिधीने ट्रम्प यांच्यासमोरच हे आरोप वाचून दाखवले. त्यामुळे ट्रम्प भडकले. एका गुन्हेगाराचे कथित आरोप फुगवून सांगून तुम्ही माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहात, अशा शब्दांत त्यांनी पत्रकाराला झापले. तो हल्लेखोर माथेफिरू, ख्रिश्चन विरोधी आणि विकृत आहे, असेही ट्रम्प म्हणाले.

Comments are closed.