मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा प्रस्ताव…मी माझ्या पक्षात राहिलो माझंही भल झालं; मुरलीधर
मावळ,पुणे: भाजप नेते आणि खासदार मुरलीधर मोहोळ (murlidhar mohol) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी त्यांना दिलेल्या ऑफरचा किस्सा सांगितला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मला राष्ट्रवादीत येणाची ऑफर दिल्याचा किस्सा भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (murlidhar mohol) यांनी काल (सोमवारी) तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या डॉ. केशव बळीराम हेडगेवार या इमारतीचे उद्घाटनावेळी सांगितला आहे. (murlidhar mohol)
Murlidhar Mohol: शेळकेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिला फोन मला केला
मुरलीधर मोहोळ म्हणाले, 2019च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सुनील शेळकेंना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर शेळके राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि सुनील शेळकेंची उमेदवारी जाहीर झाली आणि शेळकेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिला फोन मला केला. माझं भाजपमधून तिकीट कट झालं आहे, मला राष्ट्रवादीतून तिकीट दिले आहे, तुझं पण तिकीट कट झालं आहे.
मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मला राष्ट्रवादीत येणाची ऑफर दिल्याचा किस्सा भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलाय.#murlidharmohol #sunilshelke #NCP #भाजप #पुणे pic.twitter.com/ymy7xkq2e1
— अंकिता शांतीनाथ खाणे (@KhaneAnkita) 21 ऑक्टोबर 2025
Murlidhar Mohol: मी माझ्या पक्षात राहिलो माझंही भल झालं
कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील आलेत, तू माझ्याबरोबर चल, त्यावेळी मी सुनील शेळकेंना बोललो मी दिल्या घरी सुखी आहे. तू पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ नकोस, तर शेळके बोलले नाही, आता मी परतीच्या दोर कापले आहेत, तो त्या पक्षात गेला त्याचं भल झालं, मी माझ्या पक्षात राहिलो माझंही भल झालं, कारण आमची मैत्री अशी आहे. त्या काळात देखील माझी आठवण सुनिल शेळकेंना आली, असा हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील ऑफरचा किस्सा तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मोहळ यांनी सांगितला आहे.
संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी – भरणे
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या डॉ. केशव बळीराम हेडगेवार या इमारतीचे उद्घाटन काल (सोमवारी) झाले. त्यावेळी भरणे बोलत होते. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, शंकर मांडेकर, माजी आमदार बाळा भेगडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यावेळी उपस्थित होते. भरणे म्हणाले, ‘राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारही मोठी मदत करत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरीव मदत केली जाईल. संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे.’
आणखी वाचा
Comments are closed.